HW News Marathi
महाराष्ट्र

आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य! – जयंत पाटील

मुंबई | महाराष्ट्राचे लोकनेते असलेल्या आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे, अशा तीव्र शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी या दगडफेकीच्या मागचे कर्ते करविते जे कोणी लोक असतील त्यांना आणि दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

आदरणीय शरद पवारसाहेबांच्या घरावर आज काही समाजकंटक व्यक्तींनी दगडफेक केली. काल न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर काही लोकांनी पेढे वाटले असताना, आज त्याच समूहातील व्यक्तींनी अशा प्रकारे पवारसाहेबांच्या घरावर दगडफेक करण्याचे कारण काय ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात अशा प्रकारे कधीही नेत्यांच्या घरावर चालून जाण्याचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत झाले नव्हते याची आठवणही जयंत पाटील यांनी करुन दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोन्ही छत्रपती जर एकत्र आले तर, महाराष्ट्रातील कुठल्याही मराठा समाजावर अन्याय होणार नाही

News Desk

विरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात !

News Desk

आता आधार कार्डसाठी जीएसटी

News Desk