HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेच्या वाघाचे संवर्धन करणे, ही माझी जबाबदारी, मुनगंटीवार यांची राऊतांवर टीका

नागपूर | वाघाचे संवर्धन करणे, त्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे, असा टोला वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे. कोणी गुरगुरते म्हणून सोडत नाही, वाघाला सोबतच घ्याचे संवर्धन आणि संरक्षण करायचे, असे सांगत राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे संकेत देखील मुनगंटीवार यांनी दिले आहे.

मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात सरकार जर विशिष्ट मर्यादेपर्यंत स्थापन न झाल्यास काय होईल, यावर घटनेतील तरतुदी मी पत्रकारांना सांगितली. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देणे ही धमकी असा प्रश्न उपस्थित होत नाही. गेल्या पाच वर्षात मी युती कायम राहवी, मन जुडावी यासाठी काम केले आहे. माझी भाषाही तोडणार कधीच राहिली नाही. शिवसेना- भाजप यांचा संबंध जोडावा अशीच राहिली असल्याचा दावा देखील मुनगंटीवार यांनी एच. डब्ल्यू.मराठीशी बोलताना केला आहे.

मी वनमंत्री आहे

जर मुदामन कोणी गुरगुरायचे ठरविल तर मी वनमंत्री आहे. वाघाचे संवर्धन करणे, त्यांचे संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. कोणी गुरगुरते म्हणून सोडत नाही, वाघाला सोबतच घ्याचे संवर्धन आणि संरक्षण करायचे, असे सूचक विधान करत शिवसेनेवर मुनगंटीवार यांच्यावर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांकडून काँग्रेसच्या महापालिकांना निधी मिळत नाही, अशोक चव्हाणांनी व्यक्त केली नाराजी

News Desk

अमावस्येच्या फेऱ्याला एक वर्ष पूर्ण झालं, फडणवीस-पवारांच्या शपथविधीवरुन राऊतांचा टोमणा 

News Desk

‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ स्वीकारण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

Aprna