HW News Marathi
देश / विदेश

‘सेलिब्रिटीजची चौकशी करा’ असे माझे आदेश नव्हते ! | गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काहीच दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीजना प्रत्यत्तर म्हणून राज्यातील ज्या खेळाडू आणि सेलिब्रिटीजनी ट्विट केले होते त्यांच्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ज्या आदेशांमध्ये आता गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. “शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर सेलिब्रिटीजनी केलेल्या ट्विटसंदर्भात माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा सहभाग असण्याची होती. त्यामुळे मी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. लता मंगेशकर आमचे दैवत आहेत”, असे आज (१५ फेब्रुवारी) अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

गृहमंत्री आज असेही म्हणाले कि, “सचिन तेंडुलकर यांना संपूर्ण देशातील जनता मानते. त्यामुळे त्यांच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. या ट्विट प्रकरणात भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख आणि इतर १२ इन्फ्लुएन्सरचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात हे उघड झाले आहे.” त्याचप्रमाणे, या प्रकरणी पोलीस कार्यवाही करत असल्याची माहिती देखील अनिल देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या या स्पष्टीकरणानंतर ते आपल्याच आदेशांवरून युटर्न का घेत आहेत ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. गृहमंत्र्यांच्या आदेशांमुळे त्यावेळी राज्यातील भाजपच्या नेत्याने ठाकरे सरकारवर जोरदार टीकाही केली होती. आता याबाबत सरकारने मवाळ भूमिका घेतली आहे.

दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून देशातील अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत “आपला देश विभागण्याचा प्रयत्न होत असून तसं होऊ देऊ नका” असे आवाहन केले होते. मात्र, मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांकडून झाला होता. याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या खेळाडू आणि सेलिब्रिटीजमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित गानसम्राज्ञी लता मंगेशकर, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचीही नावे होती ज्यामुळे वादंग निर्माण झाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#PulwamaAttack : पाकिस्तानी वृत्तपत्राने दहशतवाद्यांना म्हटले ‘स्वातंत्र्यसैनिक’

News Desk

जेष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन

News Desk

LIVE UPDATE | काश्मीरच्या ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान मोदींचा जनतेशी संवाद

News Desk