HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ

अहमदनगर | अहमदनगर येथील केडगावच्या दोन शिवसैनिकांची हत्या केल्या प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. जगताप यांना गुरुवारी न्यायालयाने १६ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सेनेचे शहर उपप्रमुख संयज कोतकर व पदाधिकारी वसंत ठुबे यांच्या हत्येनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको करत जगताप यांच्या अटकेची मागणी केली होती. चौकशीसाठी जगताप यांना ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालयात घुसून कार्यालयाचे नुकसान केले होते. जगताप यांना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर इतरांच्या पोलीस कोठडीतही वाढ करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शांतता-सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे वागू नका, मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन

News Desk

विकास आराखडा तातडीने तयार करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश

Aprna

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा वादप्रकरणी पालकमंत्र्यांचे आवाहन

News Desk