HW News Marathi
महाराष्ट्र

जळगाव महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग झाला मोकळा, मात्र भाजपला बसला धक्का

जळगाव | राज्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज (१८ मार्च) जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने विरोध केला होता. भाजपची अशी मागणी होती की, महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे. यासाठी भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे जळगावात आता महाविकासआघाडीचे वजन आणखी वाढले आहे.

दरम्यान, या आधीही भाजपला एक मोठा धक्का बसला होता तो म्हणजे भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण झाली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे ऑनलाईन मतदानाला परवानगी दिली असताना दुसरीकडे मात्र गिरीश महाजन यांनाही कोरोना झाल्याने भाजपच्या चिंतेत भर पडली आहे. आज (१८ मार्च) जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणुक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजप बाजी मारणार की महाविकासआघाडी हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस महासंचालकांची बैठक, भोंग्यासंदर्भात राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता?

Aprna

‘नुसती बोलाची कढी आणि बोलाचा भात’, केशव उपाध्येंचा राज्यसरकारला टोला

News Desk

निकालापूर्वीच मुश्रीफांची विजयी मिरवणूक तर पुण्यात दोडके यांनी बॅनरबाजी

News Desk