HW News Marathi
देश / विदेश

“त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे”, जावेद अख्तरचं ते वक्तव्य चर्चेत

मुंबई | प्रसिद्ध कवी जावेद अख्तर त्यांच्या एक वक्तव्यमुळे चर्चेत आहेत. जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.

तालिबान बनण्याची पूर्ण ड्रेस रिहर्सल

एनडीटीव्हीशी संभाषण करताना जावेद अख्तर, ज्यांनी अफगाणिस्तानातील तालिबानची सत्ता ताब्यात घेण्यास नाखूष असलेल्या भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गावर टीका केली. ते म्हणाले की, राईट विंग जगात एक आहे. भारतातील अल्पसंख्यांकांच्या मॉब लिंचिंगच्या काही घटनांवर अख्तर म्हणाले, ‘पूर्ण तालिबान बनण्याची ही एक प्रकारची पूर्ण ड्रेस रिहर्सल आहे. ते तालिबानी युक्तीचा अवलंब करत आहेत. ते एकच लोक आहेत, फक्त नाव वेगळे आहे. भारतीय राज्यघटना त्यांचे ध्येय आणि त्यांच्यामध्ये येत आहे, परंतु जर संधी दिली तर ते ही सीमा ओलांडतील’, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

ते रानटी आहेत पण ….

जावेद अख्तर पुढे म्हणाले, “‘मला वाटते जे आरएसएस, विहिंप, बजरंग दल यासारख्या संघटनांना समर्थन देतात, त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तालिबान अर्थातच मध्ययुगीन मानसिकता आहेत, यात शंका नाही, ते रानटी आहेत पण तुम्ही समर्थन देत असलेल्यांपेक्षा ते वेगळे कुठे आहेत? त्यांची बाजू मजबूत होत आहे आणि ते त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत. त्यांची मानसिकता सारखीच आहे’.

भारतीय मुस्लिम अशा वक्तव्याने हैराण झाले

अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीच्या आगमनानंतर भारतीय मुस्लिमांच्या एका वर्गाने व्यक्त केलेल्या आनंद आणि इस्तकबालावर जावेद अख्तर म्हणाले की, अशा लोकांची संख्या खूप कमी आहे. ते म्हणाले की हे फ्रिंज आहेत, बहुतेक भारतीय मुस्लिम अशा वक्तव्याने हैराण झाले आहेत.

हे लोक हिंदू राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न

जगभरातील राईट विंगमधील समानतेकडे लक्ष वेधून अख्तर म्हणाले, ‘मुस्लिम राईट विंग असो, ख्रिश्चन राईट विंग असो किंवा हिंदू राईट विंग असो, जगभरात त्यांच्यामध्ये एक समानता आहे. तालिबानला जे हवे आहे, ते म्हणजे इस्लामिक देश निर्माण करणे आणि हे लोक हिंदू राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते म्हणतात की, परंपरेपेक्षा जे वेगळे आहे ते स्वीकारता येत नाही. या लोकांना असेही वाटते की कोणत्याही मुलगा आणि मुलीने एकत्र पार्कमध्ये जाऊ नये. फरक एवढाच की, हे तालिबानी इतके शक्तिशाली झाले नाहीत. पण त्यांचा हेतू तालिबानसारखाच आहे.’

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अफजल गुरूच्या मुलाने केंद्रांकडे केली पासपोर्टची मागणी

News Desk

फटाके फोडणे आणि मारणे ही भारतीय संस्कृती नाही – प्रकाश जावडेकर

News Desk

HW Exclusive : चीन सीमावादात नेहमी ‘या’ पाच रणनितीचा वापर करते !

News Desk