HW News Marathi
देश / विदेश

HW Exclusive : चीन सीमावादात नेहमी ‘या’ पाच रणनितीचा वापर करते !

मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत. यामुळे चीन आणि भारत या दोन्ही देशात सध्या तणावाचे वातावरण आहे. या परिस्थितीतून भारत आणि चीन यातून कोणता तोडगा निघले. तसेच चीनविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर काय केले पाहिजे. गलवान खोऱ्या घटनेनंतर भारताने काय शिकले पाहिजे, या संदर्भात एच. डब्ल्यू. मराठीने आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांच्याशी खास बातचीत केली आहे.

“चीनमुळे गलवान खोऱ्यात भारतीय जवान शहीद झाले आणि देशात कोरोना यामुळे चीनच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. कोणताही दोष नसताना भारतीयांना लॉकडाऊनमुळे घरात बसावे लागले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आणि आता गलवान खोऱ्यात हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले. यामुळे चीनविरोधात देशभरात प्रचंड राग वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर मोठा दबाव येणार आहे,” असे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान, चीन आणि भारत यांच्याकडे सध्या तीन पर्याय असल्याचे शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले,पाहूयात ते पर्याय कोणते

१) पहिला मार्ग म्हणजे याआधी चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशातील वाद नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणे. मात्र, याआधी दोन्ही देशातील सैन्य अधिकारी यांच्यामध्ये चर्चा होती. यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पातळीवर चर्चा होणे गरजेचे आहे.

२) भारतासाठी दुसरा मार्ग म्हणजे, चीनला गलवान खोऱ्यातून हुसकावून लावणे. भारताने १९९९मध्ये कारगिलच्या वेळी पाकिस्तानने घुसखोरी केली तेव्हा भारताने पाकिस्तानला कारगीलमधून हुसकावून लावले. त्याचप्रमाणे भारताला चीनसोबत करावे लागेल. मात्र, जेव्हा अशा प्रकारचे संघर्ष सैन्यामध्ये होतात, तेव्हा आपणही चीनच्या ताब्यातील काही प्रदेश आपल्याकडे घेऊ शकतो. यानंतर आपण चीनसोबत देवाणघेवाण करू शकतो. त्यामुळे अशा प्रकारची देवाण-घेवाण चीनसोबत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी शक्यता शैलेंद्र देवळाणकरांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केली.

३) तिसरा मार्ग म्हणजे, भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी करावी लागणार आहे. कारण, भारताला जगसमोर चीनचे खरे रूप आणावे लागणार आहे. यात चीन हा भारतावर कशा पद्धतीने युद्ध लादत आहे. चीन हा बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी करतोय, या सर्व गोष्टी आपल्याला जगापुढे आणणे गरजेचे आहे. यामुळे या सर्व बैठकीत एस. जे. शंकर यांची महत्वाची भूमिका असणार आहे. एस. जे. शंकर यांच्या माध्यमातून भारताला आंतराष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी करावी लागणार आहे.

शैलेंद्र देवळाणकर पुढे म्हणाले, चीनने भारतीय प्रदेशात घुसखोरी केली आहे, चीनने हल्ला केला आहे. खऱ्या अर्थाने चीनने माघार घेणे गरजेचे आहे. परंतु चीन असे करेल असे वाटत नसल्याचेही त्यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना सांगितले. भारताला खूप मोठ्या प्रमाणमात चीनवर आंतरराष्ट्रीय दबाव आणावा लागेल. आणि त्यांना चर्चेसाठी तयार करणे ही आपली प्राथमिकता आहे.

चीनला भारतासारखी मोठी बाजारपेठ गमवायची नाही

सध्या भारत – चीनमध्ये तणाव असल्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकला जात आहे, या प्रश्नावर शैलेंद्र देवळणकर म्हणतात, भारतात चीनच्या वस्तूंची मोठी बाजारपेठ असल्यामुळे भारतासोबत चीन युद्ध करणार नाही. कारण आजच्या घडीला ८० अब्ज डॉलर चीनी वस्तू भारतीय बाजारपेठेत विकल्या जातात. या वस्तू स्वस्त असल्यामुळे सर्रासपणे भारतीय बाजारपेठेत विकल्या जातात. जर उद्या भारत-चीन संघर्ष वाढला, भारतीयांनी चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला तर सध्याच्या परिस्थिती चीनला ते परवडणार नाही. कारण कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत आहे. अशा प्रसंगी ८० अब्ज डॉलरची बाजारपेठ गमविणे हे चीनला परवडणारे नाही. त्यामुळे चीन हा संघर्ष वाढवेल असे मला वाटत नाही, असे मत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना मांडले आहे.

भारताने २०१७मध्ये डोकलाम वेळी चीनला सांगितले होते की चीनी वस्तू भारत विकत घेणार नाही. त्यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी माघार घेतली होती. आता जर चीनने सीमेवर अधिक संघर्ष निर्माण केला तर भारताने चीनच्या मोबाईल कंपनीशी ५जी करार केला आहे त्यावर विचार करावा लागेल असे भारत चीनला सांगू शकतो. चीनला भारतासारखी मोठी बाजारपेठ गमवायची नाही, असे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले.

अशी आहे चीनची ’पाच’ पद्धतींची रणनिती

शैलेंद्ज्यार ज्या वेळा चीन एखाद्या प्रदेशावर आपला दावा करतो. तेव्हा चीन पाच पद्धतीच्या मार्गाचा अवलंब करतो.

पहिला टप्पा म्हणजे इशारा देणे, चीन सांगतो की, हा प्रदेश आमचा आहे. दुसरा म्हणजे धमकी देणे, जर तुम्ही आम्हाला हे दिले नाही तर आम्ही हल्ला करू, तिसरा टप्पा म्हणजे, शक्ती प्रदर्शन, चौथ्या टप्पा म्हणजे हल्ला करणे आणि पाचवा आणि शेवटा टप्पा म्हणजे नेहमी प्रमाणे ते माघार घेतात, अशी चीनची रणनिती असल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना केला आहे. आता चीनने भारतावर गलवान खोऱ्यात केलेला हल्ला हा तिसरा टप्पा होता, असेही त्यांनी सांगितले. चीन हा सीमावाद लवकर सोडवणारा देश नाही. चीनला सीमावाद हा चिघळत ठेवायची सवय आहे. कारण चीन सीमावादावरून भारतावर दबाव आणतात. चीनचे १४ देशांसोबत सीमावाद आहे परंतु चीनने ते अजूनही सोडविलेले नाहीत. सीमावाद न सोडविणे ही चीनची कार्यपद्धती आहे.

विरोधकांना विश्वासात घेणे गरजेचे

भारत सध्या देशांच्या सीमेवर जे काम करत आहे ते कोणत्याही परिस्थिती बंद होता कामा नये. भारताने सीमेवरील दळणवळण हे इतके मजबूत केले पाहिजे की, कोणतीही परिस्थिती आली तरीही भारतीय सैन्य कमी वेळात देशाच्या सीमेवर पोहचेल.सध्या देशांच्या सीमेवरील रस्ते आणि विमानतळ ही कामे सुरूच ठेवली पाहिजे. चीनने भारताला कितीही धमकावले तरी भारताने माघार घेता कामा नये. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर विरोधीपक्षांना विश्वासात घेणे महत्वाचे असते. संपूर्ण देशाने आपल्या सैन्याच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. कारण आपल्या मध्ये मतभेद असतील तर याचा फायदा चीन घेऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थिती सर्वांनी एकत्र येऊन चीनच्या विरोधात आपल्या सैन्यासोबत उभे राहिले पाहिजे, असे मत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर यांनी एच. डब्ल्यू. मराठीशी बोलताना व्यक्त केले.

संपूर्ण मुलाखत

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सैन्य दलातील भरतीच्या ‘अग्निपथ’ योजनेविरोधात बिहारमध्ये आंदोलन

Aprna

कोजागिरी पौर्णिमेला दुधाचे सेवन का केले जाते?

Gauri Tilekar

उन्नाव बलात्कार प्रकरण उत्तर प्रदेशाबाहेर चालविले जाणार

News Desk