HW News Marathi
महाराष्ट्र

“केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे!”, भाजपचा सरकारवर निशाणा

मुंबई। मुंबईत काल(११ सप्टेंबर) एक भयंकर घटना घडली आहे. साकीनाका इलाक्यात एका महिलेवर बलात्कार करून तिच्या गुप्तांगात घुसवण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. बऱ्याच राजकीय नेत्यांनी या घटनेवर संताकजनक प्रतिक्रिया देत विरोधी पक्षाने सरकारवर थेट हल्ला चढवला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी देखील ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी या घटनेचा दोष संपूर्णपणे ठाकरे सरकारला दिला आहे.

सरकारचे लक्ष नाही

राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून याला केवळ सरकारचा नाकर्तेपणाच जबाबदार आहे. यांना फक्त आपली खुर्ची सुरक्षित कशी ठेवता येईल याचीच काळजी लागून आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यात हे सपशेल अपयशी ठरले आहे. अशी टीका प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारवर केली आहे. तसेच, मुंबईत बलात्कार झालेल्या महिलेचा प्रश्न ऐरणीवर आहे. मुंबईमधील महिला आज भयभीत आहेत. मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर अनेक लोक राहत असून सुरक्षित होते. आज त्या प्रतिमेला तडा लागला आहे. त्यांना सरकारचा नाकर्तेपणा जबाबदार आहे. कारण, मागील काही दिवसात मोठ्याप्रमाणावर अशा प्रकारच्या संख्या घडल्या आहेत. पुन्हा पुन्हा अशा घटना घडत आहेत, याचा अर्थ सरकारचे लक्ष नाही. पोलिसांवर नियंत्रण नाही. पोलिसांना योग्य मार्गदर्शन नाही, असे प्रवीण दरेकर म्हणाले आहेत .

पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा

साकीनाका घटनेतील विकृत नराधमाला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित भगिनीला लवकर न्याय मिळावा यासाठी मुंबई भाजपा महिला मोर्चाच्या वतीने पवई पोलिस स्टेशनच्या बाहेर काढण्यात आलेल्या निदर्शन मोर्चाला भेट दिली,पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं

मुंबईत साकीनाका परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने अक्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. बरेच नेते मंडळी संताप व्यक्त करत आहेत. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. . या घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना झापलं आहे. साकीनाक्यातील दुर्देवी घटनेचं राजकारण करणं विरोधकांनी थांबवलं पाहिजे. असं राजकारण करणं म्हणजे मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्यासारखं आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी विरोधकांना सुनावलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका – चित्रा वाघ

News Desk

जिवंत बाळाला केले मृत घोषित, जालना जिल्हातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा

News Desk

इकबाल मिर्ची मालमता प्रकरण : प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल

News Desk