HW News Marathi
महाराष्ट्र

जाणीवपूर्वक बदनामी सुरु असल्याचा जयंत पाटलांचा आरोप!

सांगली। भाजप नेते किरीट सोमय्या यांची राज्य सरकारमधील मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच आहे. सोमय्या यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या मुलावर 127 कोटी रुपयाच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यावरुन आता जोरदार राजकारण सुरु झालंय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. मंत्र्यांवर धादांत खोटे आरोप करणं, मंत्र्यांना टार्गेट करणं ही अतिशय चुकीची पद्धत आहे. किरीट सोमय्या जाणीवपूर्वक आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं काम करत आहेत. मुश्रीफ या घोटाळ्यात सहभागी असतील असं मला वाटत नाही, असा दावा जयंत पाटील यांनी केलाय. ते सांगलीमध्ये बोलत होते.

चौकशीत काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही

कुणीही आरोप केले तर त्याची चौकशी होतेच, चौकशी अडवू नये. सांगली मध्यवर्ती बँकेच्या चौकशीत काही निष्पन्न होईल असे मला वाटत नाही. जनसामान्य माणसात त्यांची प्रतिमा चांगली राहते, असंही पाटील म्हणाले. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर जयंत पाटील यांची सत्ता आहे. पुणे विभागाचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी सांगली जिल्हा बँकेचे चौकशीचे आदेश दिले आहेत. शिराळ्याच्या आमदार मानसिंगराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई होत आहे.

हसन मुश्रीफ यांचा पलटवार

मी अनेक दिवसांपासून सांगत होतो, माझा पक्ष आणि पवार साहेबांवर आरोप झाले. त्याला मी प्रत्युत्तर दिले. त्यामुळे माझ्यावर आरोप होणार ही खात्री होती. या आरोपांचा मी निषेध करतो, त्यांच्या CA पदवीवर शंका येते. या आधीच धाड पडली मात्र त्यांना काहीच मिळालं नाही. सोमय्या यांना यातील काही माहिती नाही. त्यांनी कोल्हापूरमध्ये येऊन माहिती घ्यायला हवी होती. चंद्रकांत पाटील आणि समरजीत घाटगे यांच्या सांगण्यावरून हे आरोप झाले. मी सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार. दोन आठवड्यात कोल्हापूर कोर्टात दावा दाखल करणार आहे, असा इशारा मुश्रीफ यांनी दिलाय.

किरीट सोमय्या यांचे आरोप

किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला.बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

रेणुका शहाणेंनी अमृता फडणवीसांना सुनावलं! फडणवीसांच्या काळात मुंबईत असुरक्षित वाटलं नाही का ?

News Desk

भोंदूबाबाने 3 मुलींवर केला बलात्कार, राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडली: चित्रा वाघ यांची सरकारवर टीका

Aprna