HW News Marathi
महाराष्ट्र

‘राष्ट्रवादीच काम सर्वात वेगानं, मोदी सरकारचा कारभार चुकीचाच’- जयंत पाटील

दाभोळ | राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने ते दापोली येथे बोलत होते. कार्यकर्त्यांना बोलता यावं आणि त्यांच्या भावना लक्षात याव्यात, यासाठी ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आहे, आपल्याला कार्यकारिणीचा विस्तार आपण करायला हवा. असं बोलताना जयंत पाटलांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडलंय. त्याचबरोबर, बूथवर वेगवेगळी टीम न करता एकच टीम कार्यरत राहावी हा प्रयत्न करा. या मतदार संघात आपली ताकद निर्माण करण्यासाठी तळागाळात काम करा, असे आवाहन त्यांनी केले.

हाच वेग कायम ठेवला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या मतदारसंघात फडकेल

केंद्र सरकारचे काम अतिशय चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. महागाई वाढत आहे. लोकांचे याबाबत प्रबोधन करा. सरकारची चुकीची बाजू लोकांना दाखवा, बुथ कमिट्या पक्षाचा बुरुज आहे. हा बुरुज मजबूत ठेवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे काम हे सर्वांपेक्षा अधिक वेगाने आहे. हाच वेग कायम ठेवला तर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा या मतदारसंघात फडकेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.आगामी काळात अनेक निवडणुका येऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाच झेंडा फडकायला हवा, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि इथले संघटन मजबूत करा, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

जेटी, बंदरे असतील, इथला सीआरझेडचा प्रश्न असेल, यासाठी पाठपुरावा करून हे प्रश्न मार्गी लावण्याचे काम फक्त एक जागृत लोकप्रतिनिधी करू शकतो. सुनील तटकरे यांच्या पाच वर्षांच्या काळात आपल्याला लक्षात येईल की, मागच्या कालखंडात जे इतर खासदार करू शकले नाही, ते काम त्यांनी केले आहे, अशा शब्दात जयंत पाटील यांनी स्तुती केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

असंवेदनशील, अहंकारी व शेतकऱ्याचा मारेकरी पंतप्रधान म्हणून इतिहासात मोदींची नोंद! – नाना पटोले

Aprna

#26/11Attack : कसाबला फाशी दिली मात्र अजूनही अनेक नराधम जिवंत आहेत !

News Desk

आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात कपात

News Desk