HW News Marathi
महाराष्ट्र

“मी तसं बोललोच नव्हतो, माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला”

सांगली | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे सरकार चिंतेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांचे एक वक्तव्य चांगलेच गाजत आहे. त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान हे वक्तव्य केले. तुमचे चेहरे पाहून कोरोना या जगातून गेला, असे मला वाटत असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले होते. दरम्यान, एकीकडे राज्यातील कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने सरकारने धार्मिक,राजकीय कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. मात्र, सरकारमधीलच काही नेत्यांकडून याचे उल्लघंन केले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

मात्र, आता जयंत पाटील यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे. माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यात येत आहे. पंढरपूर येथील झालेल्या जाहीर सभेमध्ये समोरच्या गर्दीतील अनेकांनी मास्क घातलेला नव्हता. त्यावर मी इतकेच म्हणालो की, तुमच्याकडे बघून जगात कोरोना नाही असेच वाटते. मात्र असे करू नका. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. दुपारी तीन वाजता मंत्रि मंडळाची बैठक आहे त्यामध्ये लॉकडाऊन करायचे, कडक निर्बंध घालायचे याबाबत निर्णय होणार आहे, असे मी म्हटल्याचा खुलासा जयंत पाटील यांनी केला. मात्र, प्रसारमाध्यमांनी दिवसभर माझ्या पहिल्या दोन वाक्यांनाच जास्त प्रसिद्धी दिली. मी नंतर जे बोललो ते दाखवलेच नाही. त्यामुळे माझ्या वक्तव्याबाबत गैरसमज निर्माण झाला, असे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

काल (४ एप्रिल) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या येऊ घातलेल्या पोटनिवडणूकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पंढरपूरात गेले असता त्यांनी एक धक्कादायक विधान केले होते. तुमचे चेहरे पहिल्या नंतर कोरोना जगात नाही असे वाटत आहे. यामुळे मास्क काढून बोलतोय असे शासन विरोधी वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले होते.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी येथे आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालक मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार संजय मामा शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, भगिरथ भालके यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘आपलं सरकार आहे म्हणून स्टेडियमला स्वत:चं नाव दिलं’

जयंत पाटील यांनी रविवारी रांजणी येथील प्रचारसभेत जोरदार फटकेबाजी केली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. आपलं सरकार आहे म्हणून गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला त्यांनी स्वतःचं नाव दिलं. बांग्लादेश स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय इंदिरा गांधींचे आहे, तिथेही आपण बांग्लादेश स्वतंत्र लढ्यात होतो असं सांगत आहेत. मागचा इतिहास पुसून आपण सर्वात श्रेष्ठ आहोत, हे सतत सांगण्याचा प्रयत्न काहींकडून केला जात आहे असा टोला जयंत पाटील यांनी यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.

देशभरात पेट्रोल डिझेलचे भाव वाढले आहेत, शेतकरी बांधव दिल्लीत आंदोलनाला बसले आहेत. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्याला यावर बोलण्यास वेळ नाही. आज नोकरदारांच्या नोकऱ्या सुरक्षित नाही, तरुणांच्या हाताला काम देण्याची सरकारकडे कुवत तर नाहीच पण आहे त्या नोकरीवरही मोदी सरकारने टांगती तलवार ठेवली आहे, अशी जोरदार टीकाही जयंत पाटील यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांची मने जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्रभर ‘जन आशीर्वाद दौरा’

News Desk

शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका

Adil

लोकशाही राहिली का?याचा देशाने विचार करणे गरजेचे, राऊतांच्या कारवाईनंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aprna