HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. जयंत पाटील यांनी स्वतः ट्विट करुन याची माहिती दिली आहे. ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे’, असे ट्विट जयंत पाटील यांनी केले आहे.

 

पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यावेळी राज्यात बऱ्याच ठिकाणी ते फिरत होते. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेतेही होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल आमचे मार्गदर्शक, ते आम्हाला कायमच प्रिय !

News Desk

लॉकडाऊनचा कृषि उत्पन्न बाजार समित्यांवरील परिणामांसंदर्भात समिती गठीत

News Desk

#Coronavirus : रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण

News Desk