HW News Marathi
महाराष्ट्र

१२ आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे राज्यपालांना कितपत मान्य आहे – जयंत पाटील

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं होतं. १२ आमदारांनी निलंबित झाल्यावर थेट राज्यपालांची भेट घेतली होती. नियुक्ती बाबत अद्याप कोणताही निर्णय आला नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्यसरकारने राज्यपालांना आठवण करून दिली आहे त्यामुळे नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवलंय

साताऱ्यात आज (१६ जुलै) बोलत असताना त्यांनी सांगितलं कि, ‘देशात आणि राज्यात आमदारांच्या नियुक्त्या रखडवून ठेवण्याचा अशाप्रकारचा अनुभव कधी आला नाही. राज्य सरकारने एखादी गोष्ट शिफारस केल्यानंतर इतक्या प्रचंड प्रलंबाने त्याच्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. इतका विलंब का लागतोय? असा प्रश्नही जयंत पाटील यांनी केला आहे.

आमच्या पध्दतीने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पाठवल्या आहेत. मात्र प्रलंबित नियुक्त्या राज्यपालाकडून रखडल्या आहेत. राज्यसरकारचा शिफारशी करण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला निर्णय न घेतल्यामुळे अधिकारावर गदा येतेय का? हा खरा प्रश्न आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ई पास रद्द करण्याचा ठाकरे सरकारचा निर्णय!

News Desk

‘मी घरी बसणार, मी कोरोनाला हरवणार’,आरोग्यमंत्र्यांचा विश्वास

swarit

“पंकजांनी भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या का?”; धनंजय मुंडे म्हणाले, “नाही, पण…”

News Desk