HW News Marathi
महाराष्ट्र

आगामी निवडणुकांसाठी प्रशांत किशोर देणार का शिवसेनेला साथ ?

मुंबई | २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावणारे राजकीय पंडित आणि जेडीयूचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज (५ फेब्रुवारी) भेट घेतली आहे. ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना किशोर यांनी मार्गदर्शन केल्याची माहिती मिळाली आहे. प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसेना आणि भाजपामध्ये युती होण्याचे संकेत दिसत आहे.

‘मातोश्री’वर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत प्रशांत किशोर यांनी महत्त्वाच्या चर्चा झाली आहे. त्यानंतर शिवसेना नेते, खासदार आणि युवासेना कार्यकारिणीसोबत त्यांची महत्त्वाची बैठक झाली. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीत हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते.

तसेच प्रशांत किशोर यांच्या मातोश्री भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांची ही सदिच्छा भेट होती. ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते. ही भेट राजकीय नव्हती, असेही राऊत म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोहित पवारांनी केलं मोदींचं कौतुक!

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांच्या भेटीला

News Desk

‘गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवले तर बरे’, सेनेने अमित शहांना सुनावले

News Desk