HW News Marathi
महाराष्ट्र

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त जीवनदान महाअभियान रक्तदान शिबिर !

मुंबई | राज्यात रक्ताचा मोठा तुटवडा असून अवघे दोन-तीन दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. राज्यातील रक्ताची नितांत गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज (९ डिसेंबर) राज्यभरात जीवनदान महाअभियान रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून २० डिसेंबरपर्यंत राज्यभरातून २५ हजार पिशव्या रक्त संकलित करण्याचा संकल्प आहे, असे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

मुंबईतील दादरस्थित टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात थोरात यांच्या हस्ते आज या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. थोरात म्हणाले की, राज्यातील रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सोनियाजींच्या वाढदिवसाचे औचित्य साधत रक्तदानाचा हा चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे. २० डिसेंबरपर्यंत राज्यभरात ब्लॉक स्तरावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात केले जाणार आहे. मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते यात सहभागी होतील व रक्तदान करतील असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१८-४४ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लसीकरण केले जाणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

News Desk

“कंगना राणावत से दूर रहो”, गृहमंत्र्यांना धमकीचे फोन सुरूच…

News Desk

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Aprna