HW News Marathi
महाराष्ट्र

१८-४४ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लसीकरण केले जाणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | संपूर्ण देशात १८ वर्षांवरील सगळ्यांना लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. १ मेपासून संपूर्ण देशभरात या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. याच लसीकरणाच्या मुद्यावर ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. १८ ते ४४ वर्षांवरील सगळ्यांना ही कोरोना लस मोफत देण्यात येणार आहे. ५ कोटी ७१ लाख लोकांना ही लस मोफत दिली जाणार आहे. राज्य सरकार या लसीसाठी ६५०० कोटी रुपये मोजणार आहे.

आज (२९ एप्रिल) राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. गेले अनेक दिवस मोफत लसीकरणावरुन वाद सुरु होता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्य सरकार मोफत लस देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही अधिकृत घोषणा न केल्याने राजकारण आणि विरोधी पक्ष तापलं होतं. मात्र, आता ठाकरे सरकाराने मोफत लसीकरण देण्याचा मोठा निर्णय दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लोकांना वाटतं की मी कोरोनाची लस घेतली आहे – शरद पवार

News Desk

महापौरपदाची सोडत जाहीर

News Desk

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राजीनामा देणार?

News Desk