HW News Marathi
महाराष्ट्र

पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी झगडतोय..ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायत,उद्धव ठाकरे होणं अवघडं!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (२ एप्रिल) यांच्या रात्रीच्या संबोधनावर तसंच त्यांच्या कार्यकर्तृत्वार विरोधी पक्षाकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच भाजप नेते सातत्याने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना दिसून येत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्याच भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे, अशा शब्दात आव्हाड यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतला आहे.

पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय, पण हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय

“पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी झगडतोय. तरीही धीरदोक्तपणाने हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय. टीका करणं सोपं आहे. पण उद्धव ठाकरे होणं अवघड आहे. स्वतःच्या हृदयात अनेक स्टेन्स असताना देखील ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायेत.. त्यास सलाम! सलाम!! सलाम!!!”, असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काल रात्रीच्या संवादावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात कोरोना वाढण्याची कारणं सांगितली नाही. उपाययोजनाही सांगितल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांचं कालचं भाषण कशासाठी होतं? तेच कळलं नाही, असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

लॉकडाऊनला आमचा विरोध नाही. अपवादात्मक स्थितीत लॉकडाऊन करावा लागतो. पण तो नियम होता कामा नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन करताना देशातील शेवटच्या घटकाचाही विचार केला होता. मुख्यमंत्र्यांनीही तेच करायला हवं. केवळ जगभरातील देशात कोरोना कसा वाढतो हे सांगून चालणार नाही, त्या देशांनी काय पॅकेज दिलेत हे सुद्धा पाह्यलं पाहिजे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यापासूनच भाजपने त्यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यांना पदावर राहण्याचा हक्क नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने भाजपने केली होती. मात्र, या सगळ्य़ा कोरोनाच्या परिस्थितीतूनही जात असताना त्यांनी उत्तम राज्य सांभाळले आहे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही वारंवार मुख्यमंत्री उत्तम काम करत असल्याचे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MPSCExam : विद्यार्थ्यांचे मानसिक आणि आर्थिक खच्चीकरण होतंय, फडणवीस सरकारवर भडकले

News Desk

“देशप्रेमाच्या गप्पा मारणारे भाजप सरकार ‘सरदार उधम’च्या ऑस्कर मुद्द्यावर गप्प का?”

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, योगी आदित्यनाथ यांच्याबाबत साक्षीदाराने केला गौप्यस्फोट

Aprna