HW News Marathi
महाराष्ट्र

‘तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढं तपासा’; जितेंद्र आव्हाडांनी महेश शिंदेंना सुनावलं

मुंबई | साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदावरुन कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती. शरद पवारांनी आता अध्यक्षपद सोडावं, असं म्हणत पात्र नसलेल्यांना बॉडीवर घेतल्याचं दु:ख वाटतं, असं खोचक वक्तव्य शिंदेंनी केलं होतं. तर त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शिक्षण संस्था चालवायला अक्कल लागते. तुमचा मेंदू कुठे आहे, ते तपासून पहा, अशा शब्दांत आव्हाडांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार साहेबांवर टीका केली की काही जणांना आपण कर्तृत्ववान असल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशा बातम्यांनी टीव्हीवर झळकायला मिळतं, वृत्तपत्रात नाव यायला सुरुवात होते. कुठल्या गावातला कोण महेश शिंदे, त्यांची गौरी शंकर नावाची शिक्षण संस्था आहे. पण, मदन जगताप यांच्यासोबत ५० टक्के पार्टनरशिप असलेल्या या संस्थेची अवस्था काय आहे? क्लर्कना पगार नाही, प्राध्यापकांचा पगार नाही. विद्यार्थ्यांच्या फीचा अत्तापत्ता नाही. शिक्षणसंस्था चालवायला अक्कल लागते,’ अशी खोचक टीका आव्हाडांनी केली आहे. तसेच तुम्ही घेतलेल्या साखर कारखान्याचे काय झाले? असा सवालही त्यांनी शिंदेंना केला आहे.

शरद पवार त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखले जातात

आव्हाड पुढे म्हणाले, “तुम्ही शरद पवारांपेक्षा उंचीने २ इंच कमी आहात, असं तुम्ही म्हटलं होतं. पण, शरद पवार हे त्यांच्या उंचीमुळे नाही तर त्यांच्या कर्तुत्वामुळे ओळखले जातात. रयत शिक्षण संस्थेचा बहुजन समाजासाठी जो उद्देश होता त्याच पद्धतीने या संस्थेची पाळंमुळं खेडोपाड्यात पसरली त्यामागे फक्त पवार साहेब होते”, असं त्यांनी सांगितलं. तसंच ते म्हणाले की ‘ज्या उद्देशाने रयत शिक्षणसंस्थेची स्थापना करण्यात आली होती, ज्या पध्दतीने या संस्थेची गावागावात पाळंमुळं पसरली, त्यामध्ये फक्त पवारसाहेब होते. त्यामुळे आपण ज्यांच्याबद्दल बोलतो आहोत, त्यांच्यासमोर आपलं कर्तृत्व किती आहे, हे कधीतरी तपासा. बोलायचं म्हणून तुम्ही खूप बोलू शकता, पण स्वत:ची लाज स्वत:च्या हातानेच घालवू नका. तुम्ही उंचीने किती मोठे आहात त्यापेक्षा तुमचा मेंदू कुठे आहे, तेवढं तपासून पाहिलं तर बरं होईल,’ अशा शब्दात आव्हाडांनी पवारांवर टीका करणाऱ्या महेश शिंदेंना सुनावलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धान खरेदी केंद्राचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Aprna

महाविकास आघाडी म्हणजे गोंधळात गोंधळ, फडणवीसांची टीका

News Desk

औरंगाबादमध्ये पहिल्या फेरीत महाविकासआघाडीच्या सतीश चव्हाण यांची आघाडी

News Desk