HW News Marathi
महाराष्ट्र

नागपूर मेट्रोची जॉय राईड

नागपूर | नागपूरकर हे अनेक महिने विनातिकीट मेट्रोची ही जॉय राईड एन्जॉय करू शकणार आहेत. इच्छा असेल, त्याला या जॉय राईडमध्ये समाविष्ट करुन घेण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. सध्या नागपूर मेट्रो ही तीन स्टेशन्सवर धावते. ही धाव सध्यातरी जॉय राईडच्याच स्वरुपात ठेवण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.

नागपूर एक संपूर्ण पट्टा तयार करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. यात ११ स्टेशन १४ किलोमीटर अंतरा दरम्यान असणार आहेत. हा पट्टांचे काम पूर्ण झाल्यानंतर तिकीट घेण्यात येणार आहे. खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट दक्षिण, अरपोर्ट, उज्ज्वल नगर, जयप्रकाश नगर, छत्रपती चौक, अजनी चौक राहटे कॉलनी, काँग्रेस नगर, आणि सीताबर्डी (इंटरचेंज) अशी ११ स्टेशन पहिल्या कमर्शियल रन तयार करणार असून हे कामे पूर्ण करण्यासाठी ६ ते ८ महिने लागणार आहे.

सुरुवातीला काही दिव्यांग, वृद्धाश्रमात राहणारी मंडळी, तर काही अनाथाश्रमातील मुले, तसेच मीडिया अशा वेगवेगळ्या घटकांना हा जॉय राईड देण्यात आला. यापुढेही शनिवार आणि रविवार असे आठवड्यातील दोन दिवस जी संस्था, संगठन किंवा व्यक्ती जॉय राईड घेऊ इच्छितात त्या सर्वांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवाजी महाराजांच्या जागी आम्ही उदयनराजेंना मानतो…

swarit

अर्णब गोस्वामींविरोधात शिवसेनेचा हक्कभंग प्रस्ताव ! सभागृहात प्रचंड गोंधळ…

News Desk

चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय

Aprna