HW News Marathi
Covid-19

सोशीअल डिस्टसिंगचे पालन करत के.ई.एम. रुग्णालयातील सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई | कोरोना रुग्णांची सेवा देत असताना रोजंदारी कामगार सुरेंद्र सतबिरसिंग सरकनिया यांचे २४ मे रोजी निधन झाले त्यांचे निधन कसे झाले याचा तपास काल (२५ मे) संध्याकाळी ७ वाजेपर्यंत के.ई.एम. रुग्णालय प्रशासनान करू शकले नाही. सुरेंद्र सतबिरसिंग सरकनिया हा तरुण रोजंदारी कामगार कोरोना कक्ष क्र. २० येथे कार्यरत होता. मागील ४ दिवसापासून त्याला ताप येत होता. परंतु टी.के. ऑफिस मधून रजा मिळणार नाही असे सांगितल्यामुळे, सुरेंद्र सरकनिया स्वतःला त्रास होत असतांनाही आपले कर्तव्य बजावत होता, याचे प्रशासनाला काहीही देणे-घेणे नाही रविवारी (२४ मे) दुपार नंतर अचानक त्रास जाणवू लागल्यामुळे ठाणे येथून के.ई.एम. रुग्णालयात येत असताना वाटेतच सुरेंद्र सरकनिया याचे निधन झाले. गेल्या २४ तास उलटून गेले तरी रुग्णालय प्रशासन सुरेंद्र याचे निधन कसे झाले याचा शोध घेत आहे.

के.ई.एम. रुग्णालयातील मर्च्युरी विभागातील कर्मचाऱ्यांशी याबाबत वारंवार फोन करून विचारणा केली असता काल पासून सुरेंद्र सरकनीया याची बॉडी येथेच आहे, अजून आम्हाला त्याचे निधन कशामुळे झाले याचा रिपोर्ट (DC) दिलेला नसल्याचे सांगण्यात आले. याबाबत, आज (२६ मे) सकाळ पासून किमान १०/१५ वेळा डॉ हेमंत देशमुख सर, डॉ मिलिंद नाडकर सर, डॉ बारसे मॅडम यांना मोबाईलवर तसेच लँडलाईन वर फोन करून DC द्यावी अशी विनंती केली परंतु सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांबाबत अँलर्जी असलेले आणि कामगार काम करीत नाहीत म्हणून कामगारांची बदनामी करणारे के.ई.एम. रुग्णालयाचे अधिकारी आणि कोणतीही शहानिशा न करता कामगारांवर तोंड सुख घेणारे महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांना यांचा जाहीर निषेध करण्यासाठी आज सकाळी ७ वाजता हजेरी लावून डीन ऑफिस समोर सोशीअल डिस्टसिंग राखून आंदोलन करावे असा निर्णय सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे.

तरी सर्व संवर्गातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी ७ वा. हजेरी लावून डीन ऑफिस समोर येऊन प्रशासनाचा जाहीर निषेध तसेच रोजंदारी कामगार सुरेंद्र सतबिरसिंग सरकनिया याचा कोरोना रुग्णांची सेवा करतांना निधन झाले, त्याचा DC रिपोर्ट अजूनही रुग्णालय प्रशासनाने दिलेला नाही त्याचा जाब विचारणे आणि प्रामाणिकपणे काम करूनही कामगारांची बदनामी करणाऱ्या रुग्णालयाचे अधिकारी आणि स्वतःला महान समजणारे महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा निषेध करण्यासाठी सोशीअल डिस्टसिंग राखून डीन ऑफिस समोर मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे, ही विनंती

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

८२ वर्षाच्या पार्ले -जी बिस्किटाने लॉकडाऊनच्या काळात केली विक्रमी नोंद

News Desk

अशोक चव्हाणांना राग आला तरी खरं बोलणारच !

News Desk

….नाहीतर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, केंद्रीय गृहमंत्रालयाची राज्यांना कडक सूचना

News Desk