HW News Marathi
महाराष्ट्र

NCB विरोधात खळबळजनक दावे; मलिक म्हणाले, “मी आता…”

मुंबई । बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी आता एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी यांचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल यांनी एनसीबीविरोधात केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी २५ कोटी रुपयांची डील झाली त्यापैकी ८ कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार आहेत असा मोठा दावा प्रभाकर साईलने केल्याने आता हे प्रकरण आणखी तीव्र होणार असल्याची शक्यता आहे.

नव्या खुलाशाच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. “राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. तसेच या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी”, असं नवाब मलिकांनी सांगितलं आहे. यासाठी आपण स्वतः गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांना भेटणार असल्याचंही नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. ते टीव्ही९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू!

“समीर वानखेडे खोट्या केसेस बनवून लोकांना अडकवत आहेत. दहशत निर्माण करत आहेत. मी पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांना सांगणार आहे की, या शहरात ऑर्गनाईज क्राईम सुरू आहे. या लोकांनी हजारो कोटी वसूल केले आहेत. त्यामुळे आता या घटनेची दखल घेऊन एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.

व्हिडिओत प्रभाकर साईल काय म्हणाला?

आपल्या व्हिडिओत केपी गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल म्हणाला की, “आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी उभी राहिली. आमच्यामागून एक इनोव्हा कार आली आणि त्या गाडीमागे निळ्या रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितलं तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर होती. पुढे के. पी. गोसावी, सॅम आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत काय झालं हे तेव्हा मला समजलं नाही. पण, त्यांनी गाडीमधून पुन्हा फोन केला की, ‘२५ सांग, फायनल १८ कर, त्यातले ८ समीर वानखेडेंना जाणार आहेत. १० आपण वाटून घ्यायचे आहेत.’ ते हे फोनवर बोलत होते जे मी ऐकलं.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकारच्या ७ वर्षांच्या काळ्या कारभाराची पोलखोल करणार, कॉंग्रेसची उद्या राज्यभर निदर्शन

News Desk

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, कधी तरी आत्मचिंतन करा! 

News Desk

त्या मुलांची सीबीआय चौकशी झाली पाहिजे, प्रिया बेर्डेंची मागणी!

News Desk