HW News Marathi
महाराष्ट्र

कल्याणराव काळे राष्ट्रवादीच्या वाटेवर? भाजपला आणखी एक धक्का बसणार का?

पंढरपूर | पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकीची पोटनिवडणूक येऊ घातली आहे. दरम्यान, या निवडणूकीच्या आधीच भाजपला धक्के मिळत आहेत. भाजपचा उमेदवार समाधान आवताडे यांच्या विरोधात त्यांचेच चुलत बंधू निवडणूकीला उभे राहिले आहेत. आता आणखी एक धक्का भाजपला बसण्याच्या तयारीत आहे. भाजपचे कल्याणराव काळे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. यापूर्वी शरद पवारांच्या दौऱ्यातही कल्याणराव काळे स्टेजवर पाहायला मिळाले होते. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक लागलेली असतानाच आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्याच दिवशी या मोठ्या घडामोडी घडत आहेत.

काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार

भाजपचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार असल्याची माहिती मिळालीय. कल्याणराव काळे समितीच्या कोअर कमिटीमध्ये हा निर्णय झाल्याचं त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून समजलंय. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलसुद्धा लवकरच कल्याणराव काळेंच्या फॉर्महाऊसवर स्नेहभोजनासाठी जाणार असल्याचीही माहिती समोर येतेय. त्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर

गेल्या काही दिवसांपूर्वी सरकोली येथे झालेल्या कार्यक्रमात कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत एकाच मंचावर उपस्थित होते. त्यावेळीही कल्याणराव काळे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू- कल्याणराव काळे

विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात कल्याणराव काळे यांनी केलेल्या एका वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी म्हटले होते. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते. कल्याणराव काळे यांनी २०१४ मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून ६५ हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ शीतल आमटे- करजगी यांनी आमटे कुटुंबीयांवर केलेले आरोप आणि वाद काय आहे जाणून घ्या…

News Desk

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांवर नाना पटोलेंचं स्पष्टीकरण

News Desk

काँग्रेसला धक्का, माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन

News Desk