HW News Marathi
देश / विदेश

मुंबईत आल्यावर कंगनाला होम क्वारंटाईन व्हावे लागेल ! | महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई । मुंबई महानगरपालिकेने आता बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतला नियमांची आठवण करून दिली आहे. “कंगना राणावत येत्या ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. त्यावेळी, नियमानुसार तिला होम क्वारंटाईन व्हावे लागेल”, असे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले आहे. दुसऱ्या राज्यातील येणाऱ्या व्यक्तीला नियमानुसार प्रवासानंतरचे दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागते. त्यानुसार कंगनालाही होम क्वारंटाईन केले जाईल, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे.

“अभिनेत्री कंगना राणावत येत्या ९ सप्टेंबरला हिमाचल प्रदेशहीन मुंबईत येणार आहे. दुसऱ्या राज्यातून आलेल्या व्यक्तीला ICMR ने सांगितलेल्या नियमानुसार होम क्वारंटाईन व्हावे लागते. त्याप्रमाणे नियमानुसार कंगनाला देखील तो नियम लागू असेल. एअरपोर्टवरच कंगनाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जाणार जाईल”, असे म्हणत महापौर किशोरी पेडणेकर यांनी नियमांची आठवण करून दिली आहे.

“दुसऱ्या राज्यातून आलेल्या व्यक्तीला होम क्वारंटाईन व्हावे लागते. ICMR कडून तशी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. मला मिळालेल्या माहितीनुसार, आज किंवा उद्यामध्ये काही नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिका कार्यवाही करेल”, असेही किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘तलाक तलाक तलाक’ अखेर हद्दपार ..तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर !

News Desk

अन्यथा बंद होईल ATM कार्ड

News Desk

काश्मिरात नक्की काय होणार ते मोदी व शहाच सांगू शकतील!

News Desk