HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्राची नाही तुमची निंदा करते, कंगनाचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर!

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिने मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत कंगनाला हरामखोर म्हटले होते. त्यावर कंगनाने सडेतोड उत्तर दिले आहे. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि आणि महाराष्ट्राची नाही तुम्ही निंदा करते असे तिने म्हटले आहे.

“संजय राऊत तुम्ही मला एक हरामखोर मुलगी आहे असे म्हटले होते. तुम्ही एक मंत्री आहात तुम्हाला माहित असेलच की, या देशात रोज, दर तासाला मुलींचे शोषण केले जाते त्यांचा बलात्कार केला जातो. त्यांच्या शरीराचे तुराकडे करुन फेकून दिले जातात. जिथे त्या काम करतात त्या जागी त्यांना अपमानित केले जाते. आणि या सगळ्याला जबाबदार मानसिकता आहे. आणि तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले आहे देशातील मुली तुम्हाला माफ करणार नाहीत. आमिर खान, नसरुद्दीन शाह यांनीही मुंबईत राहणे सुरक्षित वाटत नाही हे म्हटलेले तेव्हा त्यांना कोणी हरामखोर म्हटले नाही”.

मुंबई पोलिसांचे मी नेहमीच कौतुक केले आहे. मात्र, पालघर मॉब लिंचीग प्रकरणात पोलिस काही करत नाहीत. किंवा सुशांतसिंग राजपूतच्या वडलांच्या एफआयआर घेतली जात नाही. या प्रशासनावर मी निंदा केली. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. संजय राऊत मी तुमची निंदा करते, महाराष्ट्राची नाही. आणि मी ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. तुमची लोकल मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. मात्र, देशाच्या अस्मितेसाठी आम्ही प्राण देऊ शकतो. भेटुया ९ तारखेला. जय हिंद, जय महाराष्ट्र !”

 

https://www.facebook.com/1530120110612444/posts/2516526548638457/

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध! – आदित्य ठाकरे

Aprna

राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास, लातूरवर पाणीटंचाईचे संकट

Gauri Tilekar

भांडूप आग प्रकरण : मुख्यमंत्र्यांनी मागितली मृतांच्या कुटुंबीयांची माफी, कुटुंबीयांना ५ लाखाची मदत जाहीर

News Desk