HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाचा शरद पवारांवर मोर्चा, तर पवारांनी महाराष्ट्र उभा केला या शब्दांत आव्हाडांचे प्रत्युत्तर

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर काल (९ सप्टेंबर) महापालिकेने हातोडा फिरवला. त्यानंतर कंगनाच्या खार परिसरात असलेल्या फ्लॅटवरुन कंगना राणावतने आता शरद पवारांकडे बोट दाखवलं आहे. कंगनानं ट्वीट करत म्हटलं आहे की, महाराष्ट्र सरकारचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत. बीएमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस पाठविली नाही. खरं तर सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी मी स्वत: सर्व कागदपत्रं बीएमसीला दिली होती. बीएमसीसमोर किमान आपल्या धैर्याने उभे राहण्याची ताकत माझ्यात आहे. आता खोटं का बोलत आहेत? असा सवाल कंगनानं ट्वीटमधून केला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1303712672131592198?s=19

यासंदर्भात तिनं ट्वीट केल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाला तिचं नाव न घेता उत्तर दिलं आहे. फ्लॅटचं अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने कंगना राणावतला नोटीस बजावली होती. या नोटिसमध्ये असं म्हटलं होतं, फ्लॅटमध्ये चुकीच्या पद्धतीने बदल करण्यात आले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन केले गेलं आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहीत नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली, असं आव्हाडांनी म्हटलं आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आपल्या हातात सत्ता नाही म्हणून नैराश्येपोटी ते सरकारविरोधात हॅशटॅग ट्रेंड करतात !

News Desk

मला शेतकऱ्यांना कर्जमुक्त आणि चिंतामुक्त करायाचे !

swarit

पुण्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुण्यातील मृतांचा आकडा ३२ वर

News Desk