HW News Marathi
महाराष्ट्र

कंगणाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख!

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत आज (९ सप्टेंबर) मुंबईत दाखल झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. आज सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर पालिकेनं कारवाई केली. या कारवाईला सुरुवात होत असताना कंगनानं शिवसेना आणि पालिकेवर टीकेची झोड उठवली. आता मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनानं पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1303636961131782147?s=19

 

कंगनाने मुंबईमधील घरी पोहोचताच एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे आज तुम्ही माझं घर तोडलं आहे उद्या तुमचं गर्वहरण होईल असं कंगनाने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.एक व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ अशा तीन शब्दांत कंगनानं तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची २९ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू

News Desk

पुणे बेंगलोर महामार्गावर अपघात, १७ जणांचा मृत्यू, २० जखमी

News Desk