HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवीवर कन्नड नागरिकांनी फासले काळे

मुंबई | महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नडीगांनी काळे फासल्याची घटना घडली आहे. कर्नाटक विधानसभेचे आज (१३ डिसेंबर) बेळगावमध्ये अधिवेशन सुरू होते. परंतु दीपक दळवींनी अधिवेशनाला विरोध केल्यामुळे काळे फासले. या पार्श्वभूमीवर दळवींवर काळे फासल्याच्या घटनेच्या निषेर्धार्थ उद्या (१४ डिसेंबर) बेळगाव बंदची हाक देण्यात आली आहे.

या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण, समितीचा हा मेळावा मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरूच होते. तसेच पोलिसांकडून देखील समितीच्या महामेळाव्यावर दबाव आण टाकला जात होता. यावेळी कन्नड म्युझिक संघटने दोन व्यक्ती अचानक येवून दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. यामुळे आता पुन्हा एका बेळगाव प्रश्नवर राजकारण पेटणार असल्याचे या घटनेतून दिसून आले.

कर्नाटकचे हिवाळी अधिवेश बेळगावमध्ये आजपासून सुरू झाले असून ते अधिवेशन पुढी दहा दिवस चालणार आहे. कर्नाटकाच्या मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी अधिवेशनाचा खर्चाची मर्यादा निम्म्यावर आणली. तर अधिवेशनावर जवळपास १२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून या अधिवेशनासाठी येणाऱ्या आमदार, पोलीस आणि इतर लोकांची राहण्याची सोय बेळगावामध्ये करण्यात आली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात उद्यापासून पर्यटनाला होणार सुरुवात

News Desk

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु, व्हीसीद्वारे बैठकांना उपलब्ध

News Desk

भंडाऱ्यात झालेल्या घटनेची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, फडणवीसांची मागणी

News Desk