HW News Marathi
महाराष्ट्र

प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक करण म्हेत्रेंचे निधन, सोलापुरात अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी

सोलापूर | काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि मोची समाजाचे युवा नेते करण म्हेत्रे यांचे काल निधन झाले. त्यानंतर आज म्हेत्रेंच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडोंच्या संख्येने नागरिक जमले होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात कडक लॉकडाऊन असतानाही गर्दी जमली आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना पायदळी तुडवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राज्यात कोरोना संकट अद्यापही टळलेलं नसल्याने ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. यादरम्यान अनेक जिल्ह्यांनी परिस्थितीनुसार निर्बंध कडक केले आहेत. करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी एकीकडे राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु असताना दुसरीकडे नियमांचं सर्रासपणे उल्लंघन होताना दिसत आहे.

सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते करण म्हेत्रे यांचं नुकतंच निधन झालं. यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेसाठी हजारोंच्या संख्यने लोकांनी गर्दी केली होती. राज्यात एकीकडे करोना संकट असल्याने लॉकडाऊन लावण्यात आलेला असतानाही लोकांनी तुफान गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीसमोर पोलीसही हतबल झाल्याचं चित्र होतं.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४४ कलम लागू करण्यात आलं आहे. मात्र असं असतानाही करण म्हेत्रे यांचं पार्थिव मोदी स्मशानभूमीच्या दिशेने नेलं जात असताना मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाल्याचं पहायला मिळाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार !- नाना पटोले

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त दगडूशेठ गणपतीला तब्बल 61 किलोंचा मोदक…..!

News Desk

“शिवशाही शब्द शिवसेनेने केव्हाच सोडला”, शेलारांची जहरी टीका

News Desk