HW News Marathi
महाराष्ट्र

खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे घसरले, मध्य रेल्वे ठप्प VIDEO

पुणे खंडाळ्याजवळ मालगाडीचे डबे पटरीवरून खाली उतरल्यामुळे मध्ये रेल्वे पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुंबईकडे येणारी आणि पुणेकडे जाणारी वाहतून पुर्णपणे ठप्प झाली आहे.

खंडाळा रेल्वे स्थानकाजवळ अचानक मालगाडीचे डबे घसरल्याने पुणे व मुंबई दोन्ही बाजूकडील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार डाऊन मिडल लाईनने पुण्याकडे येणारी मालगाडी खंडाळ्यातील किमी 123 व 124 दरम्यान आली असता मालगाडीचे दोन डबे रुळावरुन घसरल्याने अप व डाऊन दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. या घटनेमुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. रेल्वेचे अधिकारी व कामगार घटनास्थळी पोहोचले असून, डबे बाजूला घेण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे समजले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

… देवेंद्र फडणवीसांनी किती बिस्किटं खायला घातली होती?, भास्कर जाधव आक्रमक

Aprna

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपच्या जवळ जाणार का? जयंत पाटील म्हणतात…

News Desk

पक्षवाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवेन !

News Desk