HW News Marathi
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांसाठी मनसेच्या मोर्चेबांधणीला सुरुवात; राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर

पुणे | राज्यात पुन्हा एकदा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशात आगामी महानगरपालिका निवडणुकांच्यादृष्टीने मनसेने आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याचा दौरा करणार आहेत. राज ठाकरे आज (११ जुलै) आणि उद्या (१२ जुलै) असे दोन दिवस पुण्यात मुक्कामाला असणार आहेत.

यादरम्यान ते मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. तसेच मनसेचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीही घेणार आहेत. तसेच, पुण्यात अजूनही कोरोना रूग्ण संख्या जास्त असल्याने उगाच कार्यकर्त्यांनी भेटीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन देखील राज ठाकरे यांनी केले आहे.

दरम्यान, पुण्याच्या दौऱ्यानंतर ते पुढील आठवड्यात १६ ते १८ जुलैदरम्यान राज ठाकरे नाशिकचा दौरा करतील. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यांमुळे मनसैनिक नव्या उत्साहाने कामाला लागण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेची कार्यकारिणी बदलली होती. तर डॅशिंग नेते वसंत मोरे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

डॅशिंग अशा वसंत मोरेंना शहराध्यक्षपद

आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून.खांदेपालट करण्यात आला आहे. यामध्ये मनसेचे डॅशिंग आणि आक्रमक नेते वसंत मोरे यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर विद्यमान शहर अध्यक्ष अजय शिंदे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मी तुम्हाला कधीच विसरणार नाही – राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ व्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना एक ऑडिओ संदेश पाठवला होता. यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले होते. अनेक पराभव पचवूनही गेली १५ वर्षे साथ देणाऱ्या मनसैनिकांचे राज ठाकरे यांनी आभार मानले. ‘मी तुम्हाला कधीही विसरणार नाही,’ असा शब्दही राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना दिला.

काही जण सोडून गेले, जाऊ द्यात. पण माझ्यासोबत सह्याद्रीच्या कड्यासारखे टिकून आहेत, त्यांना मी कधीही विसरणार नाही. पक्षाला जे जे यश मिळेल, त्याचे वाटेकरी तुम्हीच असाल. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र तुमच्याच हातून घडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राऊतांची उच्च प्रतीच्या गांजाची नशा उतरली नाही का?, चित्रा वाघ यांची टीका

News Desk

शहीद पोलीस अधिकाऱ्यांना संपत्ती दाखवण्याची नोटीस

swarit

शरद पवारांचं राजकीय गणित असू शकतं, खडसेंच्या प्रवेशावर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk