HW News Marathi
महाराष्ट्र

सत्तारांनी राजीनामा दिला नाही!

मुंबई | “अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिलेला नाही. सत्तार यांची नाराजी दूर झालेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अब्दुल सत्तारांना उद्या मातोश्रीवर भेटायला बोलावले आहे”, अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी सत्तारांची भेट घेतल्यानंतर आता माध्यमांना प्रतिक्रिया देताना दिली आहे.

अब्दुल सत्तार हे आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते. शिवसेनेच्या तिकिटावर सिल्लोड मतदारसंघातून निवडून येत मंत्रिमंडळात आपल्याला स्थान मिळेल अशी सत्तार यांना अपेक्षा होती. त्यानुसार शिवसेनेने सत्तार यांना राज्यमंत्रिपद दिले तर, औरंगाबादमधून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. मात्र कॅबिनेट मंत्रिपद न मिळाल्याने खातेवाटप जाहीर होण्यापूर्वीच नाराजीने सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचं वृत्त होतं.

दरम्यान, सत्तार यांची नाराजी दूर करण्यासाठी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. खोतकर यांनी शुक्रवारी मध्यरात्री औरंगाबादेत अब्दुल सत्तार यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. अब्दुल सत्तार यांच्याशी बैठक संपल्यानंतर आता अर्जुन खोतकर हे कॅबिनेट मंत्रिपद मिळालेल्या औरंगाबादचे आमदार संदीपान भुमरे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहितीही मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विस्टाडोम कोचच्या सुरूवातीसह पुणे – मुंबई – पुणे प्रगती एक्स्प्रेस पूर्ववत

Aprna

“…तर आम्ही त्यांना एसटीच्या सीटवर बांधून ठेऊ”- नितेश राणे

News Desk

तब्लिगीच्या उरलेल्या ५० जणांनी स्वत:हून पुढे या, अन्यथा कारवाई करु

News Desk