HW News Marathi
महाराष्ट्र

अमरावती शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक दुसऱ्या फेरीतही आघाडीवर!

अमरावती | राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. अमरावती शिक्षक मतदार संघाच्या दुसऱ्या फेरीचा निकाल समोर येत आहे. यात अपक्ष उमेदवार किरण सरनाईक आघाडीवर आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार श्रीकांत देशपांडे आणि भाजप उमेदवार डॉ नितिन धांडे हे पिछाडीवर आहेत.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीला आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.आत्तापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये महाविकासआघाडीचे ४ उमेदवार आघाडीवर आहेत तर अपक्ष एक उमेदवार आघाडीवर आहे.

दुसऱ्या फेरीचा निकाल

पहिल्या पसंतीच्या मतगणनेच्या दुसऱ्या फेरीमध्ये १६ हजार ९१९ मतांपैकी ६०१ मते अवैध व १६ हजार ३१८ मते वैध ठरली.

या फेरीतील मते अशी (कंसात दोन्ही फेरी मिळून) :

डॉ. नितीन धांडे- १४६१ (२१२७)

किरण सरनाईक – २९५७ (६०८८),

श्रीकांत देशपांडे – २८२२ (५१२२)

दोन्ही फेऱ्या मिळून ३० हजार ९१८ मतांपैकी २९ हजार ८२९ मते वैध व १ हजार ८९ मते अवैध ठरली. त्यानुसार २९ हजार ८२९ या वैध मतांना भागीले दोन अधिक एक असे सूत्र वापरून कोटा निश्चित करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक राज्यपालांच्या भेटीला, वडेट्टीवार आणि भुजबळांना हटवण्याची केली मागणी

News Desk

MPSC परीक्षेतून होणारं संघीकरण आणि भाजपचा प्रचार रोखा,यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

swarit