HW News Marathi
महाराष्ट्र

मुंब्र्यात रुग्णालयाबाहेर भाजप-राष्ट्रवादीचा ड्रामा! किरीट सोमय्या आणि शानु पठाण आमनेसामने

ठाणे | राज्यात सध्या अनेक ठिकाणी आगीचं सत्र सुरुचं आहे. आज पहाटे मुंब्र्यात प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर दुर्घटनास्थळाच्या पाहणीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या घटनास्थळी गेले असता त्यांना अनपेक्षित विरोधाला सामोरे जावे लागले. राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक शानु पठाण किरीट सोमय्या यांना बघताच आक्रमक झाले. त्यामुळे प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयाबाहेर हायव्होल्टेज ड्रामा रंगताना दिसला होता

किरीट सोमय्याही आज (२८ एप्रिल) सकाळी प्राईम क्रिटिकेयर सेंटर रुग्णालयात पोहोचले. मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानु पठाण यांनी ‘किरीट सोमय्या वापस जावो’, अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि पोलिसांनी शानु पठाण यांना अडवले. आम्ही लोकांना वाचवण्याचे काम करत आहोत. भाजपच्या नेत्यांनी राजकारण करु नये, असे शानु पठाण यांनी किरीट सोमय्यांना सुनावले होते. त्यानंतर किरीट सोमय्या काहीवेळातच पाहणी करुन घटनास्थळावरून निघून गेले.

आगीत ४ जणांचा झाला मृत्यू

मुंब्रा शहरातील कौसा परिसरात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या रुग्णालयाला लागलेल्या आगीमुळे ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री रुग्णालयात आग लागली तेव्हा रुग्णालय प्रशासनाने तातडीने रुग्णांना इतरत्र हलवले. मात्र, या सगळ्या धावपळीत उपचारात खंड पडल्याने ICU वॉर्डातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वानखेडे कुटुंबिय आंबेडकर अनुयायी, दलित अधिकाऱ्यांवर अन्याय होतोय; आठवलेंचा वानखेडेंना पाठींबा

News Desk

मला खडसेंच्या उमेदवारीची अपेक्षा होती,पण…

Arati More

मराठा विद्यार्थ्यांच्या आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी ?

News Desk