मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मेट्रोची आरेतील कारशेड कांजूरमार्गला हलवणार असल्याची माहिती दिली. त्यावरून भाजपकडून हल्ला सुरू झाला आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च तब्बल 5000 कोटी रुपयांनी वाढेल, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. भाजप सरकारच्या काळात पर्यावरणवाद्यांचा विरोध डावलून आरेतील मेट्रोच्या कारशेडचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. मात्र, महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली होती. यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी मेट्रोची कारशेड आरेऐवजी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
कारशेड कांजूरमध्ये गेल्यामुळे आता मेट्रो ट्रेनच्या पार्किंगसाठी रोज आठ किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागेल. त्यामुळे मेट्रो चालवण्यासाठीच्या खर्चातही वाढ होईल. तसेच सरकारने कारशेडसाठी निवडलेली कांजूरमार्गची जमीन नेमकी आहे तरी कुठे? मेट्रोची कारशेड दलदलीच्या भागात उभारली जाणार का उच्च न्यायालयात निकाल प्रलंबित असलेल्या जमिनीवर? या जमिनीसाठी सरकारला 2000 कोटी डिपॉझिट करावे लागतील. परंतु, मुख्यमंत्री ही गोष्ट लपवून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Aarey car shed Shifting to kanjur will cost additional 5000 crore cost 5 year project delay 8km additional daily for every train to park, daily additional operation cost & where is land? Marsh Land? Or the Disputed Land which High court had asked Government deposit ₹2000 crore? pic.twitter.com/980Ci3j1mf
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 11, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.