मुंबई | काही महिन्यांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला ठाण्यात मारहाण झाली होती. याप्रकऱणी तीन पोलिसांना वर्तकनगर पोलिसांकडून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, घटनेच्या ६ महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांना कधी अटक होणार? असा सवाल भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
“ठाकरे सरकारचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्वत:च्या पोलीस अंगरक्षकांच्या माध्यमातून इंजिनिअर अनंत करमुसेचं अपहरण केलं, घरी आणलं आणि मारहाण केली. याप्रकरणी ठाकरे सरकारने सहा महिन्यांनी तीन पोलिसांना अटक केली आहे. आतापर्यंत नऊ लोकांना अटक झाली. पण जितेंद्र आव्हाड यांना कधी अटक होणार?”. अशी विचारणा ट्विटरवरुन भाजप नेते किरिट सोमय्या यांनी केली आहे.
Anant Karmuse Engineer Kidnapping & Assault by Thackeray Sarkar Minister Jitendra Awhad, 6 months completed. today 3 Constable arrested, in all 9 arrested till now. We Want action against Minister on whose instructions this incident happened @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) October 5, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.