HW News Marathi
महाराष्ट्र

“आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर”, संजय राऊतांचा सोमय्यांना इशारा 

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन सध्या भाजप आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध रंगलेले दिसत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे आणि अन्वय नाईक कुटुंबामध्ये जमिनीचे २१ व्यवहार झाल्याचा दावा केला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही या प्रकरणावरुन टीका केली आहे. यानंतर शिवसेना आक्रमक झाली असून भाजपवर निशाणा साधत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा शब्दांत किरीट सोमय्या यांना सुनावले आहे.

संजय राऊत यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “अन्वय नाईक यांच्याशी २१ व्यवहार केल्याची थाप सोमय्या महोदयांनी मारली आहे. आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. एका भगीनीचे कुंकू पुसल्याचे दु:ख या व्यापारी अवलादीस नाही. तक्रार जमिनीच्या व्यवहाराबाबत नसून भगिनीचे कुंकू पुसण्याबाबत आहे. शेठजी, जरा जपून! जय महाराष्ट्र”

किरीट सोमय्या काय म्हणाले होते?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्या कुटुंबात जमिनीचे २१ व्यवहार

झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांनी जमिनीचे व्यवहार झाल्याचं सिद्ध करणारी कागदपत्रंही सादर केली आहेत. उद्धव ठाकरे यांनी अन्वय नाईक कुटुंबीयासोबत नेमके काय संबंध आहेत हे जाहीर करण्याची मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

“२१ सातबारा उतारे आम्ही शोधून काढले आहेत. यामध्ये जमिनीचे व्यवहार झाले आहेत. असे किती व्यवहार उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक कुटंबाचे झाले आहेत? जमिनी घ्यायच्या आणि विकायच्या हा उद्धव ठाकरेंचा व्यवसाय आहे का? रिअल इस्टेटचा व्यवसाय आहे की ही गुंतवणूक आहे याची माहिती आम्हाला हवी आहे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.

“काहीही संबंध नसणारी दोन कुटुंब एकत्र येतात आणि जमिनीचे आर्थिक व्यवहार करतात आणि आपल्या पत्नीचं नाव देतात याच्या मागचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न मी कालपासून करत आहे. मी पण महाराष्ट्र्चाचा एक नागरिक आहे तर मला समजवून सांगणार का? रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांच्यातही काय संबंध आहे? एकत्र येण्यामागचं प्रयोजन काय हा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. तुम्ही सामान्य नागरिक नाही तर मुख्यमंत्री आहात म्हणून हे प्रश्न विचार आहोत,” असंही ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

..तर मी माझ्या बापाची अवलाद नाही ! दानवेंना इशारा देताना हर्षवर्धन जाधव आक्रमक

News Desk

“समाजात फुट पाडण्यास सर्व आमदार, खासदारच जबाबदार”, उदयनराजे कडाडले!

News Desk

पूरग्रस्त गावे ४-५ दिवसांत चकाचक होतील !

News Desk