HW News Marathi
महाराष्ट्र

किरीट सोमय्यांचे तीन दिवसांत चार मोठे दौरे!

मुंबई। भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्ह्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी सोमय्या यांना जिल्हाधिकाऱ्यांनी रितसर नोटीस दिली आहे. मात्र, काहीही झालं तरी मी कोल्हापूरला जाणाराच. माझा नियोजित दौरा पूर्ण करणारच असा निश्चय सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या भूमिकेमुळे त्यांना थांबवण्यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. ते कोल्हापूरकडे रवाना झाले असले तरी त्यांना कोल्हापुरात जाण्यापूर्वीच रोखले जाण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावर पोलीस तसेच सरकारला का आक्षेप आहे ? याची चर्चा होऊ लागली आहे. सोमय्या या दौऱ्यात नेमकं काय करणार आहेत ? असं विचारलं जात आहे.

हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केलाय

किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री तसेच नेत्यांवर मोठे आरोप केले आहेत. नुकतंच त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा दावा केलाय. याच कथित गैरव्यवहाराची सखोल माहिती घेण्यासाठी मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. उद्या म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी ते कोल्हापूरला जाणार आहेत. मात्र त्याआधीच त्यांना कोल्हापुरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार

किरीट सोमय्या चार दिवसांसाठी दौऱ्यावर आहेत. 20 सप्टेंबरला कोल्हापुरात जाऊन सोमय्या राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्याची पाहणी करणार आहेत. तसचे 23 सप्टेंबपरला ते पारनेरमधील आणखी एका साखर कारखान्याला भेट देतील. तसेच या सारख कारखान्याचीही सर्व माहिती ते जाणून घेतील. त्यानंतर 27 सप्टेंबर रोजी अलीबाग येथे जाऊन रश्मी ठाकरे यांच्या अलीबागच्या गोलाई येथील बंगल्याची पाहणी करतील. तसेच शेवटीच 30 सप्टेंबर रोजी सोमय्या उपमुख्यंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यालाही भेट देणार आहेत. या सर्व ठिकाणांवर आर्थिक गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार झाल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हा फक्त शिळ्या कढीला उत आणायचा प्रयत्न”, छगन भुजबळांचं प्रत्युत्तर

News Desk

राज्यातील सत्तापेचादरम्यान राज्यपालांच्या भूमिकेमुळे काँग्रेसकडून राजीनाम्याची मागणी

News Desk

हिंदुत्त्वावर शिंतोडे उडविणाऱ्या ‘त्या’ युवकावर कारवाई होत नाही, हा आश्चर्यजनक ! फडणवीस आक्रमक

News Desk