HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive: राजसाहेबांनी सांगितलं तर भाजपसोबत जाणार…

पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवे रुप येत्या २३ जानेवारीला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनसेच्या या महामेळाव्यात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले मनसेचा नवा झेंडा आणि हिंदुत्त्ववादी अजेंडा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वीच मनसेचे राज्य सरचिटणीस किशोर शिंदे यांच्याशी एच.डब्ल्यू न्युज मराठीने यांच्याशी खास बातचीत करुन मनसेचा महामेळावा, मनसे-भाजप युती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबतचे संबंध यावरती संवाद साधला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात २३ तारखेला होणाऱ्या अधिवेशनाची घोषणा केली होती, तर काय तयारी सुरु आहे?

उत्तर- या अधिवेशनासाठी पुण्यातुनही अनेक मनसैनिक आणि कार्यकर्ते जल्लोषात काम करत आहेत. पुणे शहर आणि जिल्ह्यातून हजारो मनसैनिक या अधिवेशनाला मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत, साधारण २००० कार्यकर्त्यांची नावनोंदणीही आमच्याकडे आली आहे. २३ तारखेला सकाळी ९ वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार असून काही कार्यकर्ते उद्या आणि काही कार्यकर्ते परवा सकाळी निघणार आहेत. मनसेचा अधिकृत झेंडा डिजीटल पोर्टलवरुन हटवण्यात आला आहे पण पुण्यातील काही कार्यालयाबाहेर तो अजूनही तसाच आहे तर २३ तारखेला नवीन झेंडा कार्यालयाबाहेर दिसेल का?

उत्तर- आम्हालाही याची उत्सुक्ता आहे. नक्की राज साहेब अधिवेशनात काय बोलणार, झेंड्याचा विषय निघणार का याची आम्हालाही उत्सुक्ता आहे. कारण सन्माननी राज साहेब सांगतील तेव्हाच आम्ही काही गोष्टी करु शकतो. डिजीटल पोर्टलवरुन झेंडा हटवण्यात आला आहे पण आम्हाला अजून काही अधिकृत माहिती नसल्याने आम्ही तो हटवला नाही आहे. न भुतो, न भविष्यतो असं हे अधिवेशन होणार आहे आणि कानाकोपऱ्यांतून मनसे सैनिक या अधिवेशनाला उपस्थिती दाखवतील.

मनसेच्या नव्या झेंड्याचे भगवे पोस्टर शिवसेना भवनाच्या बाहेरही लावण्यात आले आहेत त्यामुळे मनसेची वाटचाल प्रखरपणे हिंदुत्त्वाच्या वाटेने दिसते आहे त्यावर काय सांगाल?

उत्तर- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हिंदुत्त्व कधीहू सोडले नव्हते तर संपुर्ण महाराष्ट्र धर्माचा विचार केला आहे. कारण महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मांचे लोक एकत्रित येतात आणि ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र धर्माची व्याख्या सांगितली तीच पुढे घेऊन जाण्याचे काम मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि ते ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने आम्ही निश्चितच वाटचाल करु. आम्ही पुर्वीही हिंदुत्त्ववादी विचारांचे होतो आणि या पुढेही राहू. हिंदुत्त्वाचा अर्थ दुसऱ्यांना कमी करणं असा नाही आहे. तर मी हिंदु आहे याचा अभिमान असणे जास्त गरजेचे आहे.

मनसे भविष्यात हिंदुत्त्ववादी विचार असलेल्या भाजपासोबत जाऊ शकते अशी चर्चा आहे. आणि तुम्ही चंद्रकांत पाटीलांच्या विरुद्धच लढलात पण भविष्यात सोबत काम करावे लागले तर तुमची काय भुमिका असेल?

उत्तर- पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदगावकरांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे आम्ही एकला चलो रो या मार्गावर आहोत पण, भविष्यात जर भाजपासोबत जावं लागलं आणि तसं राज साहेबांनी सांगितलं तर जायचं, त्यांनी सांगितलं की यांच्या सोबत काम करायचं तर करायचं. पुर्वी आम्ही शिवसेनेत असतानाही भाजपासोबत मिळून मिसळबन काम करत होतोच. भविष्यात जर युती करायची वेळ आली तर आम्ही काम करायला तयार आहोत. आणि आमच्याकडे आमदार, नगरसेवकाला महत्त्व नसतं महाराष्ट्र सैनिकाला जास्त महत्त्व असते.

मनसेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत कसे संबंध आहेत?

उत्तर- राजकारणामध्ये कार्यकर्त्यांचे एकमेकांशी सलोख्याचे संबंध असतात परंतु राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि आपापला पक्ष आपल्या ठिकाणी असतो. आणि या विधानसभेच्या निवडणूकीत त्यांनी आम्हाला कोथरुडमधून पाठिंबा दिला होता आणि आम्हीही त्यांना मुंबई किंवा इतर ठिकाणी पाठिंबा दिला होता आणि विधानसभेच्या निवडणूकीनंतर तो चॅप्टर संपला. जर शिवसेना त्यांच्या विरुद्ध लढून महाविकास आघाडीत उतरु शकते तर आमचा पक्ष स्वतंत्र आहे आणि आमची पावले पुढे कशी जातील हे सन्माननीय राज ठाकरेच ठरवतील आणि त्याचप्रमाणे आमची पावले जातील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही

News Desk

क्रिकेट मधून झालेल्या वादात मध्यस्थी केली म्हणून उपमहापौरांवर गोळीबार!

News Desk

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट

Aprna