मुंबई | दादरच्या शिवसेना भवनासमोर शिवसैनिक आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली आहे. या राड्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांना इशारे देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तर अंगावर याल तर शिंगावर घेऊच, असा इशाराच भाजपला दिला आहे. शिवसेना-भाजपमधील धुमश्चक्रीनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा सज्जड इशारा दिला आहे. शिवसेना भवन येथील श्रद्धास्थानासमोर भाजपच्या कोणत्यातरी एका पोरानं उगाच ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. तो शिवसैनिकांनी हाणून पाडलाय, असं सांगतानाच शिवसेना भवनावर मोर्चा काढणं कितपत योग्य आहे याचं उत्तर द्या. तुम्हीही काहीही कराल आणि शिवसैनिक गप्प बसणार काय?, असा सवाल पेडणेकर यांनी केला आहे.
ते शिवसेना भवन आहे हे विसरू नका
शिवसेना नेते सचिन अहिर यांनीही या राड्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजचे भाजपचे आंदोलन निषेधार्ह आहे. शिवसेनेची राम जन्मभूमीबद्दल भूमिका काय आहे हे कोणीही आम्हाला शिकवण्याची गरज नाही . शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री बनण्याआधी आणि बनल्यानंतरही राम जन्मभूमीला भेट देऊन आले आहेत, असं सांगतानाच तुम्ही अॅक्शन कराल तर त्याला रिअॅक्शन मिळणारच. भाजपने प्रतिकात्मक आंदोलन केल असतं तर चाललं असतं. राणीच्या बागेत फिरायला गेल्यासारखं आंदोलन त्याठिकाणी केलं. ते ठिकाण शिवसेनाभवन आहे हे विसरून चालणार नाही, असा इशारा सचिन अहिर यांनी दिला आहे.
रस्त्यावर येण्याची गरज का भासली?
मुळात ज्यांना कायदा-सुव्यवस्था माहिती आहे त्यांनीच कायदा-सुव्यवस्था का बिघडवायची? राम मंदिर भूखंड घोटाळ्याचा विषय इतका जोरात गाजतोय. तर त्याची चौकशी व्हावी. इतकीच मागणी केली होती. यात दुखावण्यासारखं काय होतं? प्रत्येक गोष्टीवर स्टंटबाजी का करायची? क्रियेला-प्रतिक्रिया असतात. प्रत्येक प्रतिक्रिया संयमी नसतात. चौकशीला घाबरायचं कशाला? घाबरत नाहीत तर रस्त्यावर येण्याची गरज का भासली?, असा सवाल शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला.
नेमकं काय झालं?
अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्ते तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Mumbai: Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) workers protested outside Shiv Sena Bhavan, in Dadar, today over allegations of land scam regarding Ayodhya Ram Temple construction. A scuffle broke out b/w Shiv Sena & BJYM workers during protest.
At least 40 BJYM workers detained. pic.twitter.com/2vju6sUaL6
— ANI (@ANI) June 16, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.