HW News Marathi
महाराष्ट्र

जगदेवराव नाईक यांनी देहदान करून समाजाच्या नव्या पिढीसमोर आदर्श

माधव मेकेवाड

भोकर : मानवी शरीर हे नाशवंत असुन ते जाळुन किंवा पुरण्यापेक्षा त्या शरीराचा उपयोग व्हावा हा हेतु ठेवुन बरडशेवाळा येथील जेष्ठ नागरीक कै.जगदेवराव नाईक यांनी संपुर्ण देहदान करुन समाज व समाजातील नव्या पिढी समोर आदर्श ठेवला असुन त्यांचे मरणोत्तर कौतुक होत आहे.

या बाबत असे की,कै.जगदेवराव पारोजी मस्के नाईक रा. बरडशेवाळा ता.हदगाव येथील सामाजीक व्यक्तीमत्व.ते सधन शेतकरी असुन राजकिय क्षेत्रात काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ व्यक्ती असुन ते माजी मुख्यमंत्री डाँ.शंकरराव चव्हाण आ.बापुराव पा.आष्टीकर,मा.आ.निवृती पा.जवळगावकर,स्वा.सै.भुजंगराव पा.किन्हाळकर,मा.मंत्री दिगाबंरराव बिंदु,सह अनेक नेत्याच्या सहवासात असायचे अन त्यांच्या सोबत काम ही केले.तसेच ते निस्वार्थी व लोकांच्या संपर्कात राहायचे.त्यांना अनुभवाचा मोठा दांडगा अनुभव होता म्हणुण त्यानी वयाच्या ७९ व्या वर्षी सन २०११ ला नांदेड येथील शासकिय वैदकिय महाविद्यालयाशी संपर्क साधुन माझ्या मृतृ नंतर माझा संपुर्ण देह शैक्षणीक व संशोधन कार्यासाठी वापरात यावा म्हणून संस्थेस मरणोत्तर लिहुन दिले. त्या नंतर तब्बल १७ व्या वर्षी म्हणजे दि. १९ आक्टोबर २०१७ ला त्यांची प्राण ज्योत मावळली तेव्हा ते ९६ वर्षाचे होते.त्यांच्या त्याना एकच मुलगी आहे.येथील प्रतिष्ठीत संजीव नाईक.राजु नाईक यांचे चुलते होत तर भोकर तालुका शिवसेनेचे उप ता प्र.सुभाष नाईक,बापुसाहेब मस्के,संदिप हाके यांचे आजोबा होते.

त्यांच्या या अंतीम विधी सोहळ्याला आ.माधव पा.जवळगावकर,जिपस सुर्यवंशी,जिपस दिगबंर साखरे,बळवंतराव नाईक,राँका अध्क्ष शिवाजी शिंदे पुयनेकर,देविदासराव हाके,कृउबास उप सभापती भैय्या पाटील,जिपस राजु शिखरे पा.,डाँ.एल वाघमारे,श्याम पाटील,गुलाब हाके,दिपक चंद्रे सह तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर नागरीक हजर होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊन असतानाही अंत्यसंस्कारासाठी गेलेली आई आणि मुलगी कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

मुंबईतील शाळा सुरू करण्याचा निर्णय दिवाळीनंतर – महापौर

News Desk

महात्मा ज्योतिबा फुले यांचे ‘शेतकऱ्यांचे आसूड’ हे पुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल! – उद्धव ठाकरे

Manasi Devkar