HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

मुंबई | महाराष्ट्र सरकारने राज्यातील १५१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असून ११२ तालुक्यातील परिस्थिती गंभीर असल्याचेही म्हटले आहे. खरिप हंगामातील पीक नुकसानीचे ‘ऑन द स्पॉट’ अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे निश्चित होईल. राज्य सरकारने दुष्काळग्रस्तांना अर्थसहाय्याच्या निकषांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली जाईल, असे म्हटले आहे. ही सर्व प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण शेतकऱ्यांच्या मदतीचा मार्ग मोकळा होईल. दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत.

गंभीर स्वरुपाचा दुष्काळग्रस्त तालुके

  • सांगली – जत, कवठे महांकाळ, खानापूर, विटा, आटपाडी, तासगाव.
  • सातारा- माण-दहिवडी
  • सोलापूर – करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर.
  • पालघर – पालघर, तलासरी, विक्रमगड.
  • धुळे – धुळे, सिंदखेडा.
  • जळगाव – अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.
  • नंदुरबार – नंदुरबार, नवापूर, शहादा.
  • नाशिक – बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर.
  • अहमदनगर – कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड.
  • औरंगाबाद – औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड.
  • बीड – आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा.
  • जालना – अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.
  • नांदेड – मुखेड, देगलूर.
  • उस्मानाबाद – लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.
  • परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.
  • हिंगोली – हिंगोली, सेनगाव.
  • अमरावती – मोर्शी.
  • बुलडाणा – खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, लोणार.
  • यवतमाळ – बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव.
  • चंद्रपूर – चिमूर.
  • नागपूर – काटोल, कळमेश्वर.

मध्यम स्वरुपाचा दुष्काळग्रस्त तालुके

  • पुणे – आंबेगाव, पुरंदर सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर-घोडनदी.
  • सातारा – कोरेगाव, फलटण.
  • धुळे – शिरपूर.
  • नंदुरबार – तळोदे
  • नाशिक – देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड.
  • नांदेड – उमरी.
  • हिंगोली – कळमनुरी.
  • लातूर – शिरूर अनंतपाळ.
  • अकोला – बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला.
  • अमरावती – अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी.
  • बुलडाणा – मोताळा.
  • वाशिम – रिसोड.
  • यवतमाळ – केळापूर, मारेगाव, यवतमाळ.
  • चंद्रपूर – ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही.
  • नागपूर – नरखेड.
  • वर्धा – आष्टी, कारंजा.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ही घटना निंदनीय आहे व महाराष्ट्राला शोभा देणारी नाही!

News Desk

राज्यभरात शिवजयंतीचा मोठा उत्साह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिवनेरी किल्ल्यावर उपस्थित

swarit

‘स्वपक्षाकडूनच महिलांना डावललं जातं!’, मंदा म्हात्रेंचा पक्षावर हल्ला

News Desk