HW Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या… गुढीपाडव्याच्या सणाचे महत्त्व आणि मुहूर्त

मुंबई | चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा होणारा गुढीपाडवा  साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. आपल्याकडे गुढीपाडवा म्हणजे वर्षारंभ दिन मानला जातो.  गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवाने सृष्टीची निर्मिती केली. त्यामुळेच गुढीपूजनाला ब्रम्हध्वजपूजनही म्हटले जाते. सूर्योदयापूर्वी गुढी उभारुन सुर्यास्ताला गुढी उतरवावी, अशी माहिती वसंतराव गाडगीळ यांनी दिली.

ब्रम्हाचे पूजन अर्थातच ज्ञानाचे पूजन यादिवशी केले जाते. गुढी उभारताना स्त्री-पुरुष असा कोणताही भेद मानला जात नाही, हेही त्यांनी अधोरेखित केले. या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा इतर भारतीय प्रांतांत चेटी चांद, उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला ‘गुढीपाडवा’ असे संबोधले जाते.

गुढीपाडव्याचा मु्हूर्त

सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरामध्ये अर्थात सकाळी ६.३० ते ९.३० या वेळेमध्ये गुढी उभारावी. गुढी उभारण्यापूर्वी स्रान, घरच्या देवांची पूजा आणि आई-वडिलांना नमस्कार करावा. दुपारी नैवेद्य दाखवल्यावर सूर्यास्ताला गुढी उतरवावी.

गुढी शब्दाचा निर्माण

तेलुगू भाषेत गुढी या शब्दाचा अर्थ ‘लाकूड अथवा काठी’ असा आहे. तसाच तो ‘तोरण’ असाही आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभे करून उभारलेली कुटी अथवा झोपडी असा होतो. त्यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा.

गुढीपाडव्याचे आरोग्यदायी महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदशास्रात मानले जाते. शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

 

 

 

Related posts

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती न झाल्यास राज्यात भूकंप – उद्धव ठाकरे

News Desk

अर्थसंकल्पात फक्त घोषणा, ठोस काहीच नाहीः अशोक चव्हाण

News Desk

२० मे पर्यंत शेतकरी कर्जमाफीची ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येणार

News Desk