HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या…कोण आहेत सचिन अहिर

मुंबई | सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ काढून शिवसेनेते प्रवेश केला आहे. सचिन अहिर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज (२५ जुलै) शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे सचिन अहिर म्हणाले आहे.

पवार साहेबांना गेल्या आठवड्यात भेटण्याचा प्रयत्न केला, बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सांगण्याचे माझे धाडस झाले नाही. “शरद पवार ह्रदयात, पण आता शरीरात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंचे बळ घेऊन पक्षासाठी कार्यरत करणार असून राष्ट्रवादी तोडण्याचे काम आम्ही करणार नाही, पण शिवसेना वाढवण्यासाठी निश्चितच काम करू” अशी प्रतिक्रिया अहिर यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर दिली.

सचिन अहिर यांचा अल्पपरिचय

  • सचिन अहिर यांचा जन्म २१ मार्च १९७२ रोजी झाला आहे.
  • अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांचे ते भाचे आहेत.
  • वरळीच्या प्रेम नगर, सिद्धार्थ नगर, जिजामाता नगर, गांधी नगर, बीडीडी चाळींमध्ये अरूण गवळींच्या असलेल्या प्रभावाचा सचिन अहिर यांनी फायदा झाला
  • १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मामा अरुण गवळी यांची त्यांना मदत झाली होती.
  • अरुण गवळी यांनी स्वतः अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला होता. पण सचिन अहिर यांनी कधीही त्या पक्षात प्रवेश केला नाही.
  • २००९ साली आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते. मात्र या काळात बीडीडी चाळींचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आले होते.
  • २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता.
  • सचिन अहिर यांना वरळी परिसरातून पाठिंबा आहे. सचिन अहिर यांची श्री संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईमधल्या प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक आहे.
  • सचिन अहिर यांचे बॉलिवूड कनेक्शनही आहे. त्यांची पत्नी संगीता अहिर या बॉलिवूड चित्रपट निर्मात्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांची भागीदारी आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देशमुखांना जेलमध्ये टाकलंत, आज ना उद्या किंमत मोजावीच लागेल!”- शरद पवार

News Desk

विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबरला होणार

News Desk

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk