HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी राहुल पाटील, उपाध्यक्षपदी जयवंतराव शिंपी यांची निवड

कोल्हापूर | कोल्हापुरात काही दिवसांपासून जिल्‍हा परिषद अध्‍यक्षपदासाठी काँग्रेस व राष्‍ट्रवादी काँग्रेस यांच्‍यात ताणाताणी सुरू होती. अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी मंत्री मुश्रीफ सुरुवातीपासून ठाम होते मात्र राहुल पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्याने भाजप यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

दुपारी दोन वाजता होणार अधिकृत घोषणा

कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेसचे राहुल पाटील तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदी काँग्रेस की राष्ट्रवादी यावर जोरदार चर्चा सुरू होती.आज दुपारी दोन वाजता होणाऱ्या सभेत याची अधिकृत घोषणा होणार आहे. पालकमंत्री पाटील यांनी तत्काळ सदस्य संख्या पाहता अध्यक्षपदावर काँग्रेसचा हक्क असल्याचे सांगितले.तत्पूर्वी आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये एंट्री केली होती. त्यावेळी पदाधिकार्‍यांनी राजीनामे देखील दिलेले नव्हते.

राष्ट्रवादीला राहावा लागणार प्रतीक्षेत

अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे यासाठी मंत्री मुश्रीफ सुरुवातीपासून ठाम होते, पण आ. पी. एन. पाटील यांनीही चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी आग्रह कायम धरला. शनिवारी सायंकाळी पालकमंत्री पाटील, मंत्री मुश्रीफ व आ. पी. एन. पाटील यांच्यात शासकीय विश्रामधाम येथे अध्यक्षपदाबाबत चर्चा झाली होती. अखेर राहुल पाटील यांच्यावर शिक्कामोतर्ब झाले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

दोन्ही काँग्रेसकडून अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मातब्बर मंडळी इच्छुक होती. शिवाय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरुन काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू होती. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा सांगितला होता. मुश्रीफ यांचे विश्वासू व जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी आघाडीवर होते. याशिवाय राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य जयवंत शिंपी, विजय बोरगे यांची नावे चर्चेत होती. काँग्रेसकडून राहूल पाटील, भगवान पाटील, सरिता शशिकांत खोत, पांडूरंग भादिंगरे यांच्या नावाचा समावेश होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न देता, मराठ्यांना आरक्षण !

News Desk

राज्यातील १५१ तालुक्यांसह आणखी २५० मंडळांचा दुष्काळ यादीत समावेश

News Desk

कार्यकर्त्याच्या बाईकवरुन तीन किमी प्रवास करत जयंत पाटलांनी केली तलावाची पाहणी!

News Desk