HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूराच्या पुराचा मुंबईकरांना धक्का, उद्या गोकूळचा दूध पुरवठा असणार बंद

मुंबई | महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोल्हापूरातील पुराचा फटका आता मुंबईकरांना बसणार आहे. उद्या (२४ जुलै) मुंबईकडे होणारा गोकूळचा दूध पुरवठा बंद राहणार आहे. मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी. कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा गोकुळ दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकुळच 76 हजार लिटर दूध संकलन घटलं. आज तब्बल दहा ते अकरा लाख लिटर संकलन घटण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बहुतांशी रस्ते बंद असल्यामुळे गोकुळच्या दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांची माहिती दिली आहे.

एनडीआरएफची आणखी एक तुकडी कोल्हापूरकडे रवाना झाली आहे. दुपारपर्यंत ही टीम कोल्हापुरात पोहोचणार असल्याची माहिती मिळाली आहे. काल कोल्हापुरात दोन टीम आल्या आहेत. वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी घेण्यास सांगितली आहे. पुढील तीन ते चार तास सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी महत्त्वाचे आहेत. दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. हवामान खात्याचा इशारा देण्यात आल आहे. कोल्हापुरात पंचगंगेनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात अनेक भागात पुराचं पाणी, मुंबई- बंगळुरू महामार्ग बंद करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली, देशमुखांवरुन फडणवीसांचा थेट आरोप

News Desk

राहूल गांधी मेहनत करतयात पण कुठेतरी काही कमी पडतयं… – सामना

News Desk

राज्यात दिवसभरात ६ हजार ३८४ जण करोनामुक्त; १०५ रूग्णांचा मृत्यू!

News Desk