HW News Marathi
महाराष्ट्र

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली, कोल्हापूरमध्ये पुन्हा पूर परिस्थिती

कोल्हापूर | कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुंबई सह कोकणात आणि इतर राज्यात गेल्या २-३ दिवसं पासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक गावी नद्यांमधील पाणी गावात आणि शेतात शिरलं आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पातळीत वाढ होऊ लागली असून आज (२२ जुलै) नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची चिन्हे दिसत आहेत. पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात येत आहेत. पुण्याहून ही पथके निघाली असून दुपारपर्यंत दाखल होणार आहेत.

एनडीआरएफची पथके कोल्हापूरला रवाना

कोल्हापूर मध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. लोकांनां वेळेत मदत मिळावी म्हणून एनडीआरएफची पथके कोल्हापूरला रवाना झाली आहेत. आज (२२ जुलै) सकाळी आठ वाजता पुणे येथून दोन पथके कोल्हापूरसाठी रवाना झाली असल्याचे एनडीआरएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य महापूर परिस्थिती लक्षात घेऊन १ जून ते १५ ऑगस्टपर्यंत या पथकांना कोल्हापुरात तैनात करण्याचे नियोजन केले होते. शासनाने आज पथक पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी एक पथक कोल्हापुरात असेल तर दुसरे महापुराचा अधिक धोका असलेल्या शिरोळ तालुक्यात असेल अशी माहिती आहे.

वाहतूक कोंडी

मुसळधार पावसामुळे कोल्हापूरलामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोकणाकडे जाणाऱ्या गगनबावडा येथील मार्ग बंद करण्यात आला आहे. तसेच रत्नागिरीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. जिल्ह्यातील अनेक नद्यांचे पाणी पुलावर आल्याने स्थानिक पातळीवरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.ती वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानगर पालिकेच्या सदनिकेत कोरेगाव भीमा दंगलीतील विस्थापित कुटुंबाचे पुनर्वसन

News Desk

जालन्यात १ कोरोना पॉझिटीव्ह, दादरच्या पोलिस स्टेशनमधील हा कर्मचारी आहे

swarit

पर्यायी इंधनावरील वाहन उत्पादकांसाठी आवश्यक सुविधा देणार! – मुख्यमंत्री

Aprna