पुणे | भीमानदीकाठावरील भीमा कोरेगावजवळील ऐतिहासिक ‘विजयस्तंभ’ अभिवादन सोहळ्यासाठी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहेत. अभिवादन सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून मंगळवारी (१ जानेवारी) लाखोंच्या संख्येने आंबेडकरी बांधव या विजयस्तंभालाअभिवादन करण्यासाठी हजर आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर या वर्षी संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Koregaon Bhima: People visit 'Vijay Stambh' on the 201st anniversary of the Bhima Koregaon battle. #Maharashtra pic.twitter.com/LBiO209dkl
— ANI (@ANI) December 31, 2018
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात
भीमा कोरेगाव परिसरात गत वर्षी १ व २ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने आणि महाराष्ट्र पोलिसांनी कमालीची सतर्कता बाळगली आहे. भीमा कोरेगावमध्येच दोन हजारांपेक्षा जास्त पोलिसांचा फौजफाटा, वरुन व वज्र वाहने , अग्निशमन बंब, राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात करण्यात आले आहे. गावांमधून सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक चौकात, वस्तीवर पोलिसांचा एक अधिकारी १० कर्मचारी तैनात आहेत.
विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट
ऐतिहासिक ७५ फूट उंच विजय स्तंभाची फुलांनी सजावट करण्यात आली असून स्तंभ परिसरात बुक स्टॅल, मानवंदनेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्थानिक रहिवाशांनी अन्नछत्र उघडण्यात आले आहेत. यावर्षीही ‘एक स्तंभ एक व्यासपीठ‘ या संकल्पेचा आग्रह धरत सर्वच पक्षनेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.
काय आहे भीमा कोरेगावचा इतिहास
भीमा कोरेगावजवळ भीमानदीकाठी एक जानेवारी १८१८ मध्ये इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्यासैन्यात घनघोर लढाई झाली. यात महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा पाडाव करुन विजय मिळविला होता. या लढाईत महार रेजिमेंटच्या अनेक शुरवीरांना हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये भीमा कोरेगावजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला.
या भीमा कोरेगावच्या युद्धानंतर ब्रिटिशांनी शूर महार सैनिकांच्या स्मरणार्थ भीमा नदीच्या काठी ७५ फूट उंच विजयस्तंभ उभारून त्यावर २० शहिद व ३ जखमी महार सैनिकांची नावे कोरलेली असून स्तंभावर लिहिले आहे. १९२७ सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने अभिवादन देण्यासाठी येथे येऊ लागली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.