HW News Marathi
क्राइम

क्रांती रेडकरचे नवाब मलिकांना आव्हान

आर्यनखान ड्रग्जप्रकरणी मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप सुरू आहेत. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या आरोपावर त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांना खुले आव्हान दिले आहे. ‘मराठी असल्याचा मला अभिमान आहे, पण मला आणि मुलांना जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नवाब मलिकांना काळच उत्तर देईल. समीर वानखेडेबाबत पुरावे असतील तर न्यायालयात द्या. ट्विट का करता?’ असा सवालही क्रांती रेडकर यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा

नवाब मालिकांकडून समीर वानखेडेंवर ट्विटरबाजी सुरू आहे. मात्र समीर वानखेडेंवर केलेले आरोप सर्व खोटे असून त्यात काहीच तथ्य ऩाही. त्यामुळे पुरावे असतील तर न्यायालयात द्या, ट्विट का करतात? असे क्रांती रेडकर म्हणाल्या. या प्रकरणामुळे माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा येत असल्याचे त्या म्हणाल्या. नवाब मलिकांनी केलेल्या आरोपांवर क्रांती रेडकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पत्रकार परिषद आयोजित करून त्यांनी नवाब मलिकांना खुले आव्हान दिले आहे. तसेच पुरावे असतील न्यायालयात द्या, ट्विट का करतात असा सवालही त्यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या पोलिसाला बेड्या

News Desk

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पास्टरचा बलात्कार, मैत्रिणीसोबतही समलैंगिक संबंध ठेवण्यास केले प्रवृत्त

News Desk

“… व्हायरल होतात ते मी कसे थांबवू”, उर्फी जावेदचा पोलिसांनाच उलट सवाल

Aprna