HW News Marathi
देश / विदेश

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होतोय याचा मनःपूर्वक आनंद !

नाशिक । क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आज (३ जानेवारी) ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून साजरा होत आहे, याचा मला मनःपुर्वक आनंद होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व महिला शिक्षण दिनानिमित्त आज नायगांव, ता.खंडाळा,जि. सातारा येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनाचा प्रभाव आणि निवडणुकीची आचारसंहिता यामध्ये आज क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा उत्सव साजरा होत आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे. कारण केवळ १५ दिवसांपूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपण प्रस्ताव दिला होता. त्यानुसार महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई यांच्या कार्याला न्याय देण्याचे काम राज्याच्या महाविकास आघाडी शासनाने केले असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, या देशात बहुजन समाजाला शिक्षण देण्याचे महत्वपूर्ण कार्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई यांनी केले. महिलांना, शुद्राना ज्यावेळी शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलं त्यावेळी न डगमगता त्यांनी शिक्षण देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम केलं. त्यांच्या या अलौकिक कार्याबद्दल ब्रिटीश सरकारने यांच्या कार्याचा गौरव केला आहे. तर तुम्ही आम्ही का त्यांचा सन्मान का करू नये असा सवाल करत त्यांचा सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे असे त्यांनी सांगीतले. तसेच ज्या महिलांना सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले त्यामुळे आज महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री पदी वर्षा गायकवाड या महिला यशस्वीपणे काम करत असून आज ‘सावित्री उत्सव’ साजरा होत असल्याबद्दल मनस्वी आनंद होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की तर ‘गुजरात मॉडेल’, नवाब मालिकांची खोचक टीका

News Desk

आग्र्यातील मुघल संग्रहालयाचे म्युझियम “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे ओळखले जाणार

News Desk

पराभवानंतर राहुल गांधींनी अमेठीला दिली पहिल्यांदा भेट

News Desk