HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

कृष्णा हेगडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश, भाजपला धक्का

मुंबई । भाजपचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शुक्रवारी (५ फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी शिवसेनेते प्रवेश केला आहे. काहीच दिवसांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्कार आरोपांच्या प्रकरणी कृष्णा हेगडे चांगलेच चर्चेत आले होते. धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराची तक्रार दिल्यानंतर कृष्णा हेगडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून आपल्यालाही रेणू यांनी ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, कृष्णा हेगडे हे बराच काळ भाजपमध्ये अस्वस्थ होते.

कृष्णा हेगडे हे विलेपार्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. आताही हा मतदारसंघ भाजपकडे आहे. मात्र, पराग अळवणी हे तिथले भाजपचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, विलेपार्लेमध्ये कृष्णा हेगडे यांना संधी मिळत नव्हती. गेल्या काही काळापासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. दरम्यान, हेगडे हे खरंतर मूळचे काँग्रेसचे होते. मात्र, आता त्यांनी भाजपला राम राम ठोकत आता शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृष्णा हेगडे यांना शिवबंधन बांधले आहे.

 

‘धनंजय मुंडेवरील आरोप ऐकून धक्का बसला’ – कृष्णा हेगडे

“मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी ६ आणि ७ जानेवारी २०२१ रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.

“दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं. “आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन तार्किक निष्कर्ष काढावा” अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.

आता धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेविरोधात भाजपच्या नेत्याने आवाज उठवला आहे. आथा हे प्रकरण कुठे जाणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

 

 

Related posts

ठाकरे सरकारला आता ‘हिंदू’ शब्दाचे सुद्धा वावडे- अतुल भातखळकर

News Desk

चीन आणि पाकिस्तानावर सर्जिकल स्ट्राइक करण्याची राऊतांची मागणी, रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याला दिले उत्तर 

News Desk

राष्ट्रवादीच्या बैठकीत १० जागांवरील उमेदवार होणार निश्चित

Gauri Tilekar